News

बुलढाण्यात पिंपरी धनगर येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेवकाला ३५ हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Updated on 12 July, 2023 10:29 AM IST

बुलढाण्यात पिंपरी धनगर येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेवकाला ३५ हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

सहा लाख रुपयांचे बिल काढून देण्यासाठी ग्रामसेवक अच्युतराव माणिकराव काकडे याने ६ टक्के येवढी लाच मागितली होती. याबाबत सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. चिखली मार्गावर हाजी मलंग दर्ग्यासमोर हा ग्रामसेवक अधिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकला.

खामगाव तालुक्यातील चिंचपूर येथील एका पुरवठादाराने साहित्याचा पुरवठा केला आहे. त्याचे जवळपास ६ लाख रुपये झाले होते. जयरामगड ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचे वस्ती सुधार योजनेअंतर्गत काम झाले होते.

तरूण तरूणी लोणावळ्यात पिकनीकला आले; बंगला भाड्याने घेतला, दगडखाणीत गेले, तिथे घडली भयंकर घटना

यासाठी झालेल्या कामाचे बिल मिळण्यासाठी पुरवठादाराने ग्रामसेवकाकडे पैशांची मागणी केली. परंतु या रकमेच्या ६ टक्के रक्कम म्हणजे ३६ हजार रुपये देशील तरच तुझे बिल काढतो, असे त्यांना सांगितले.

35 रुपयांची घोषणा फक्त कागदावरच? गाईच्या दूधदरात घसरण सुरूच...

यामुळे संबंधित पुरवठादाराने लाचलुचपत विभाग गाठत तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर याची पडताळणी झाली. यामुळे सापळा रचून रक्कम स्वीकारताच काकडेला ताब्यात घेण्यात आले. त्याला बाहेर बोलावण्यात आले होते.

टोमॅटोवर मोठी ऑफर! दिल्लीत टोमॅटोची किंमत 200 रुपये किलोपर्यंत, ऑनलाइन साइट्सवर फक्त 100 रुपये किलोने विक्री
अडीच कोटी मधमाशांना किटक नाशक घातल्याने मृत्यू, धक्कादायक प्रकार आला समोर...
४ हजार शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाचा लाभ, शेतकऱ्यांना होतोय फायदा...

English Summary: Gram sevak who asked for a bribe of 35 thousand was arrested, money was demanded to draw a bill of 6 lakhs...
Published on: 12 July 2023, 10:28 IST