News

राज्यात सर्वत्र हरभरा दरात घट झाली आहे. लातूर जिल्ह्यातही हरभऱ्याच्या दरात मोठी घट झाली आहे. यामुळे शेतकरी राजाला आता हमीभाव केंद्राचाच सहारा उरला आहे. यामुळेलातूर जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकरी हमीभाव केंद्राकडे वळू लागला आहे.

Updated on 03 April, 2022 10:35 PM IST

राज्यात सर्वत्र हरभरा दरात घट झाली आहे. लातूर जिल्ह्यातही हरभऱ्याच्या दरात मोठी घट झाली आहे. यामुळे शेतकरी राजाला आता हमीभाव केंद्राचाच सहारा उरला आहे. यामुळेलातूर जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकरी हमीभाव केंद्राकडे वळू लागला आहे.

लातूर जिल्ह्यातील रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याचे बाजार भाव कमी झाले आहे हरभरा उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी आता शासकीय हमीभाव केंद्राकडे आपला मोर्चा वळवला आहे.

याचा परिणाम आता शासकीय हमीभाव केंद्रावर देखील जाणवू लागला आहे अवघ्या वीस दिवसांत लातूर जिल्ह्यातील हमीभाव केंद्रात 6 हजार 835 क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाल्याचे सांगितले जात आहे. हरभऱ्याचे दर घसरले असताना शासकीय हमीभाव केंद्राचा हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे.

पावसाळ्यात पावसाने मनसोक्त हजेरी लावल्यामुळे शेतकरी बांधवांकडे मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध झाला आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात हरभरा पेरणी केली. सध्या जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकरी हरभऱ्याची काढणी झाल्यानंतर ताबडतोब हरभऱ्याची विक्री करण्यास पसंती दर्शवीत आहेत. असे असले तरी हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना खुल्या बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे.

यामुळे शेतकरी बांधव शासनाने सुरू केलेल्या शासकीय हमीभाव केंद्रात आपला हरभरा विक्रीसाठी नेत आहेत. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, नाफेड च्या वतीने हमीभावात शेतमालाची खरेदी करण्यासाठी हमीभाव केंद्रे सुरू केली आहेत. सध्या हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना या केंद्राचा सहारा मिळत आहे.

रेणापूर येथे देखील हरभरा खरेदी केंद्र सुरू केले आहे. असे असले तरी शेतकरी बांधवांना शासकीय हमीभाव केंद्रावर शेतमाल विक्री करण्यासाठी नोंदणी करणे बंधनकारक होते. या अनुषंगाने रेणापूर तालुक्‍यातील सुमारे सव्वा दोन हजार शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केली होती. नोंदणी केल्यानंतर आठ मार्च पासून या खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष हरभरा खरेदी सुरू झाली. शासनाने पाच हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव लावून दिला आहे हमीभाव केंद्रावर याच भावात सध्या खरेदी होत आहे.

दरम्यान, खुल्या बाजारपेठेत हमीभावापेक्षा सुमारे आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमी दर मिळत आहे यामुळे हरभरा उत्पादक शेतकरी हमीभाव केंद्राकडे वळले आहेत. आतापर्यंत रेणापूर येथील हमीभाव खरेदी केंद्रावर 393 शेतकऱ्यांच्या हरभरा खरेदी केला गेला आहे. या शेतकऱ्यांनी जवळपास 6,835 क्विंटल एवढा हरभरा विक्री केला आहे.

संबंधित बातम्या:-

English Summary: Gram market prices plummet! Farmers' march now towards Hamibhav Shopping Center
Published on: 03 April 2022, 10:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)