हरभरा हे रब्बी हंगामातील महत्वाचे कडधान्य वर्गीय पिक असून या पिकाचे आहारात अनन्यसाधारण महत्व आहे. हरभरा पिका खालील क्षेत्राचा व मिळणाऱ्या उत्पादकतेचा विचार करता उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्याना मोठी संधी आहे. त्यासाठी शिफारशीत तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. योग्य जमीनीची निवड व मशागत, सुधारीत आणि अधिक उत्पादन देणाऱ्या वाणाचा वापर, वेळेवर पेरणी, खत व्यवस्थापन किड व रोग व्यवस्थापन, पेरणीपूर्वी किडनाशक, बिजप्रक्रीया,बुरशीनाशक ,ओलीत व्यवस्थापन, तण व्यवस्थापन या सर्व बाबींचा अवलंब करुन शेतकरी हरभरा पिकाचे चांगले उत्पादन घेवु शकतात.
जमीनीची निवड व मशागत -
हरभरा पिकास मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमीनीची आवश्यकता असते. पाणथळ, क्षार युक्त किंवा हलकी जमीन हरभरा लागवडीसाठी योग्य नसते. साधारणता जमीनीचा सामू १५.५ ते ८.६ च्या दरम्यान असावा. या पिकाची मुळे जमीनीत खोल जात असल्याने खरीपाचे पिक काढून झाल्यानंतर जमीनीची खोल नांगरनी करून जमीन भुसभुसीत करावी. हरभरा पिकामध्ये ३ प्रकार मोडतात -
देशी हरभरा, काबुली हरभरा, गुलाबी हरभरा.
देशी हरभऱ्याचे सुधारीत वाण -
पीडीकेव्ही कांचन (AKG-1109), पीकेव्ही हरीता (AKG-9303-12), जाकी ९२१८, विजय (फुले जी-८१-१-१), फुले विक्रम,बिडीएनजी - ७९७ (आकाश)
विशाल, देशी हरभऱ्याचे हे अधिक उत्पादन देणारे सुधारीत वाण आहेत. या वाणांचा परिपक्ववतेचा कालावधी 100 ते 115 दिवसांचा असतो.
गुलाबी हरभन्याचे सुधारीत वाण -
गुलक-१ हे गुलाबी हरभऱ्याचे अधिक उत्पादन देणारे सुधारीत वाण आहेत. या वाणाचा परिपक्ववतेचा कालावधी 110 ते 115 दिवसांचा असतो.
काबुली हरभन्याचे सुधारीत वाण -
पीकेव्ही काबुली - 2, कृपा, बिडीएनजीके - 798 या सुधारीत वाणांच्या परिपक्ववतेचा कालावधी 105 ते 110 दिवसांचा असतो.
पीकेव्ही काबुली -4, विराट या हरभन्याचे सुधारीत वाणांच्या परिपक्ववतेचा कालावधी 100 ते 115 दिवसांचा असतो
पेरणीची वेळ - ऑक्टोबरचा दुसरा आठवडा ते नोव्हेंबर च्या १५ तारखे पर्यत या पिकाची पेरणी करता येते.
रासायनिक खत - जातीचे परीक्षण करून रासायनिक खताची मात्रा ठरवावी, सर्वसाधारण माती परीक्षणाना अहवाल असल्यास शिफारशीत १० किलो नत्र, २० किलो स्फुरद व १२ किलो पालाश प्रती एकरी दयावे त्य युरीया + १२५ किलो सुपर फॉस्फेट + २० किलो म्युरेट ऑफ पोटॅश दयावा.
पेरणीची पध्दत - देशी हरभऱ्याची पेरणी ३० x १० सेंमी वर करावी तर काबुली हरभरा ४५ x १० सेमी अंतरावर पेरणी करावी. जमीनीत ओलावा असल्याची खात्री करून पेरणी करावी. पेरणीपूर्वी किडनाशक, बुरशीनाशक आणि बिजप्रक्रीया करावी.
तण व्यवस्थापन - हरभरा पिकामध्ये पिक उभे असतांना तणनाशकाची शिफारस नाही. परंतू हरभरा पेरणी झाल्यानंतर जमीनीत ओलावा असतांना पेन्डामेथलीन ३० टक्के इ.सी. हे तणनाशक १.५ लिटर प्रती एकर म्हणजेच ४० ते ५० मिली. प्रती १० लिटर पाणी या प्रमाणे घेवून उगवणपूर्व फवारणी करावी. पिकाच्या जोमदार वाढीसाठी सुरवातीचे ४० दिवसापर्यंत पिक तणविरहीत ठेवावे.
पिक संरक्षण - हरभरा पिकावर पुढील प्रमाणे किडींचा प्रादुर्भाव होतो.
घाटे अळी - ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी, एकरी ८ ते १० पक्षी थांबे उभारावेत, आर्थिक किडींचे नाव नुकसानीच्या पातळीच्या वर प्रादुर्भाव आढळल्यास एचएएनपीव्ही ५०० रोगग्रस्त अळयाचा अर्क प्रती हेक्टरी फवारावा.क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ एसजी ३ ग्रॅम किंवा क्लोरॉट्रीनीलीप्रोल १८.५ एस. सी. २.५ मिली प्रती १० लि. पाणी या प्रमाणे फवारावे.
मर रोग - हा रोग टाळण्यासाठी सुधारीत जातीचा वापर करावा. पेरणी पूर्वी बियाण्यास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचे ४ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणे बिजप्रक्रीया करावी.
मुळकुज- हा रोग टाळण्यासाठी सुधारीत जातीचा वापर करावा.पेरणी पूर्वी बिजप्रक्रीया करावी, तसेच रोगट झाडाचे मुळकुज अवशेष जाळून नष्ट करावेत.
Published on: 14 October 2023, 06:16 IST