News

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या माध्यमातून वार्षिक 6000 तीन टप्प्यात विभागून देण्यात येतात. जे शेतकरी पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत अशा सर्वांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव जिल्ह्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Updated on 21 April, 2022 7:45 PM IST

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या माध्यमातून वार्षिक 6000 तीन टप्प्यात  विभागून देण्यात येतात. जे शेतकरी पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत अशा सर्वांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव जिल्ह्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

त्यासाठी 24 एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. 24 एप्रिल रोजी ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या विशेष ग्रामसभेमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज देण्यात येणार आहेत.

नक्की वाचा:तुरीच्या दरात मोठी घसरण; शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चकनाचूर

 एवढेच नाही तर संबंधित सर्व बँक हे किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याच्या कार्यपद्धतीनुसार पात्र लाभार्थ्यांचे अर्ज विशेष ग्रामसभेत घेऊन एक मेपर्यंत त्यांना हे कार्ड  मंजूर करून कार्यवाही  पूर्ण करणार आहेत.

 किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

 किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी एक योजना असून याचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या कामासाठी आर्थिक मदत करणे हा आहे

या कार्डच्या माध्यमातून शेतीसाठी लागणारे बियाणे, रासायनिक खते तसेच किटक नाशक इत्यादी शेती कामांसाठी कर्ज दिले जाते. यासाठी सगळेच शेतकरी अर्ज करू शकतात. म्हणजे स्वतःची जमीन असणारे शिवाय इतरांचे जमीन भाडेतत्त्वावर  करणारे देखील शेतकरी किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेऊ शकतात. विशेष म्हणजे 2018-19 या वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्ये पशुपालन करणारे म्हणजे शेळीपालन, मेंढी पालन तसेच कुक्कुटपालन आणि मत्स्य पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

नक्की वाचा:केळी उत्पादकांसाठी मोलाचा सल्ला! खूपच कडक ऊन आहे तर मग अशा पद्धतीने घ्या लहानशा केळीच्या रोपाची काळजी

 हे कार्ड जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे व त्याचा फायदा मिळावा यासाठी सरकारने फेब्रुवारी 2020 मध्ये पी एम किसान योजनेचा सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा समावेश करण्याची मोहिम हाती घेतली. त्यामुळे पी एम किसानयोजनेचे संकेतस्थळ आहे यावरच किसान क्रेडिट कार्ड साठी चा अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे

English Summary: graamsabha orgnize in all graampanchyaat in jalgaon district for kcc
Published on: 21 April 2022, 07:45 IST