1. बातम्या

सरकार पंधरा हजार लोकांना देणार काम; बॅकवर्ड अँड फॉरवर्ड लिंकेड योजनेला केंद्र सरकारची मंजुरी

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


देशातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि  शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवावे, यासाठी कोल्ड चेन योजना आणि  बॅकवर्ड अँड फॉरवर्ड लिंकेड योजनेला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.या योजनेचा लाखो शेतकऱ्यांना  मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर पंधरा हजार लोकांना रोजगारही देण्यात येणार आहेत.यासह या योजनेतून ४४३ कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक करण्याची योजना आहे. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या इंटर मिनिस्ट्रियल कमिटीच्या  बैठकीत याविषयीची माहिती देण्यात आली.

केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी बैठकीत सांगितले की, कोल्ड चेन योजनेंर्गत २१ प्रकल्प ४४३ कोटी रुपयांच्या आणि १८९ कोटी रुपये अनुदानाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. ही योजना आंध्रप्रदेश,गुजरात,हिमाचल,जम्मू-काश्मीर, केरळ, नागालँड, पंजाब, तेलगंणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील शेतकरी, ग्राहक आणि युवकांसाठी फायदेशीर ठरेल.कोल्ड चेन योजनेचे उद्दिष्ट  शेतातून ग्राहकांपर्यत  कोणत्याही अडथळ्याशिवाय एकत्रित कोल्ड चेन आणि संरक्षणाच्या पायाभूत सुविधा पुरविणे हे आहे. या संदर्भात फूड प्रोसेसिंग मंत्रालयाने ट्विट केले आहे.ट्विटमध्ये  असे म्हटले आहे की, या प्रकल्पांना सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना फायदा होईल, त्याशिवाय सुमारे १२ हजार ६०० लोकांना रोजगाराच्या संधी  उपलब्ध होतील.

हे सर्व प्रकल्प आंध्र प्रदेश, गुजरात. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, केरळ,नागालँड, पंजाब,तेलगांणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशामधील १० राज्यांमधील आहेत. बॅकवर्ज अँड फॉरवर्ड लिंकेज योजनेच्या माध्यमातून ६२ कोटी रुपये खर्चाच्या आणि १५ कोटींच्या अनुदानासह बॅकवर्ड अँड फॉर लिंकेज योजनेंतर्गत ८ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.यामुळे महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेेस आणि तामिळनाडूमधील शेतकऱ्यांना पायाभूत सुविधासाठी फायदा होईल. 

 

याचबरोबर शेतकऱ्यांना कोल्डस्टोरेज सुविधा उपलब्ध होईल. या केंद्रावर सॉटिंग,कटिंग आणि पॅकेजिग सुविधा देखील उपलब्ध असेल.कोल्ड स्टोरेज ते बाजारात या उत्पादनांची वाहतूक करण्यासाठी  वाहतुकीची सुविधा देखील असेल याशिवाय किरकोळ विक्रीची सुविधा देखील  उत्पादनांच्या विक्रीसाठी उपलब्ध असेल,ज्या आठ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे, त्या भागातील सुमारे २,५०० लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters