गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा तसाच रखडला आहे. यामुळे मराठा समाज नाराज आहे. आता शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर तरी मराठा समाजाला आरक्षण मिळेल, अशी अशा अनेकांना होती.
दरम्यान, पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणातून निवड होऊन नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठा तरुणांना सरकारी सेवेत सामावून घेण्याचा निर्णय झाला. यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आभार मानले होते.
असे असताना मात्र यानंतर मराठा आरक्षणासाठीची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत काहीही बोलणे झाले नाही. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी मराठा समन्वयकांना तसे सांगितले होते.
यावेळी मात्र मराठी क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी एक गंभीर आरोप केला. सरकारने संभाजीराजे छत्रपती यांनाही मॅनेज केल्याचे दिसत आहे, असा खळबळजनक आरोप केल्याने आता खळबळ उडाली आहे. बैठकीत
संभाजीराजे छत्रपती यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच सांगितले की, कोणीही मध्ये काही बोलले, तर मी बैठकीतून निघून जाईन. तसेच काहीजणही तीच भाषा बोलत होते. त्यामुळे बैठक मॅनेज केल्यासारखी दिसत होते.
ई-वाहनांवर सबसिडी योजनेबाबत केंद्राचा मोठा निर्णय, नवीन नियम 1 सप्टेंबरपासून लागू होणार..
ही बैठक मराठा आरक्षणासाठी बोलावली होती, पण आरक्षणावर एका वाक्याचीही चर्चा झाली नाही. या गोष्टीचा मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध केला जात आहे, असे मराठा समन्वयकांनी म्हटले. आता याचे काय पडसाद उमटतात, हे लवकरच समजेल.
महत्वाच्या बातम्या;
राज्यातील देवस्थान बोर्डाच्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे कधी होणार? शेतकरी आक्रमक
ब्रेकिंग! राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबत युती..
शरद पवारांच्या नातीचा परदेशात डंका! युरोपमध्ये घुमणार बारामतीचा आवाज, बातमी वाचून कराल कौतुक..
Published on: 26 August 2022, 04:29 IST