News

जळगाव जामोद/अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना

Updated on 11 August, 2022 7:20 PM IST

जळगाव जामोद/अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ६०० रुपये मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे, हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा असून,सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी केला आहे,

विदर्भ आणि मराठवाड्यात व राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. खरीपाची पिके उध्वस्त झाली आणि इतर नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले, शेतकरी संकटात सापडला असतांना सरकारने १३ हजार ६०० रुपये हेक्टरी मदत देण्याचं जाहीर केलं ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक सरकारने केल्याने

शेतकरी प्रचंड संताप व्यक्त करीत आहेत,Farmers are expressing their anger.अतीवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी याकरीता लोकप्रतिनिधींनीचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील शेतकरी जिव धोक्यात घालून आंदोलनं करीत होते‌, पंरतु त्या वेळेस मात्र राज्यातील लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून सत्ता स्थापनेसाठी व मंत्रीपदासाठी मुंबईत ठाण मांडून

होते. त्या पाऊसामधे अनेक शेतकऱ्यांचे बळी गेले जनावरे वाहुन गेली शेतकरी सैरावैरा भटकत होता अक्षरशः शेतकरी मरणाच्या दारात उभा असुनही सरकारने शेतकऱ्यांना संकट समयी साथ दिली नाही, उलट जाणीवपूर्वक पिकाचे कमी नुकसान दाखवून दिशाभूल करणारी आकडेवारी प्रशासनामर्फत

माहिती प्राप्त करीत सरकारने नुकसानिची हेक्टरी १३ हजार ६०० रुपये जाहीर केलेली मदत तोकडी असुन शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंग करणारी आहे. त्यामुळे सरकारने वेळ काढुपणा न करता नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी प्रशांत डिक्कर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना केली आहे.

English Summary: Govt announced aid for heavy rains outrageous-Saraskat hectare should be given Rs 50,000 aid!Prashant Dikkar
Published on: 11 August 2022, 07:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)