News

जळगाव जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीचा मुहूर्त झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शासकीय खरेदी जळगाव, धरणगावसह १३ केंद्रांत सुरू झाली आहे. जिल्ह्यात नऊ हजार शेतकऱ्यांनी शासकीय केंद्रात हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली होती.

Updated on 12 April, 2021 2:00 PM IST

जळगाव जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीचा मुहूर्त झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शासकीय खरेदी जळगाव, धरणगावसह १३ केंद्रांत सुरू झाली आहे. जिल्ह्यात नऊ हजार शेतकऱ्यांनी शासकीय केंद्रात हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली होती.

जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता.३०) टाळेबंदी (लॉकडाऊन) लागू केली आहे. परंतु शासकीय हरभरा खरेदी सुरू आहे. खरेदीला जळगाव, चोपडा, पारोळा, अमळनेर, पाचोरा, रावेर येथे चांगला प्रतिसाद मिळत आहे.धुळ्यातही सुमारे तीन हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. बाजारात हरभऱ्याचे दर हमीभावाच्या जवळपास होते. परंतु सध्या दर ४५०० ते ४६०० रुपये प्रतिक्विंटल, एवढे आहेत. यामुळे शासकीय केंद्रात हरभरा विक्रीसंबंधी नोंदणीधारक शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत. शासकीय दर ५१०० रुपये प्रतिक्विंटल एवढे आहेत. जळगाव जिल्ह्यात १४ खरेदी केंद्र निश्चित केले असून, यातील फक्त बोदवड येथील खरेदी केंद्र बंद आहे. इतर केंद्र सुरू झाल्याने बाजारातील दरही स्थिरावले आहेत.

 

बाजारात हरभऱ्याला किमान ४५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. तर कमाल दर ४७५० रुपयांवर आहे. बाजारातही हरभऱ्याची आवक वाढली आहे. जळगाव व चोपडा येथील बाजार समितीत गेल्या आठवड्यात प्रतिदिन सरासरी चार हजार क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.दरम्यान, शासकीय खरेदीत मात्र काबुली हरभऱ्यासाठी स्वतंत्र दर नाहीत.

यामुळे काबुली हरभऱ्याची विक्री शेतकरी बाजारात करीत असून, काबुली हरभऱ्याचे दरही साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक आहेत, अशी माहिती मिळाली.

English Summary: Government's 13 Gram Shopping Centers started in Jalgaon
Published on: 30 March 2021, 05:47 IST