आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत विशेष आर्थिक पॅकेजमध्ये किसान क्रेडिट कार्डच्या माध्यामातून २ लाख कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करुन देणार आहे. आतापर्यंत कॉमन सर्विस सेंटर्सच्या माध्यमातून ११.४८ लाख शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्डसाठी नोंदणी केली असल्याची माहिती केंद्रीय कृषी राज्य मंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजविषयी माहिती देताना अर्थ मंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या होत्या की, आता देशातील प्रत्येक शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असेल. यासाठी पीएम किसान सम्मान निधी योजनेचा डेटा वापरला जाणार आहे.
काही दिवसांपुर्वी मोदी सरकारने देशातील काही शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डवर विना हमी किंवा विना तारण ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देणार असल्याचे घोषणा केली होती. याआधी १.६० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात होते. परंतु दूध उत्पादकांना या सुविधेचा अधिक फायदा होणार. ज्या शेतकऱ्यांचे दूध दूध संघ खरेदी करतात त्यांना याचा अधिक लाभ होणार आहे. दूध संघाशी जुडलेल्या दूध उत्पादकांना कमी व्याजदरात बँका कर्ज उपलब्ध करुन देईल. सरकारने किसान क्रेडिट कार्ड बनविण्यासाठी प्रोसेसिंग चार्ज घेतला जात होता तोही आता बंद करण्यात आला आहे. तर तीन लाख रुपयाचे कर्ज कुठलीच हमी न देता मिळणार
कोण बनवू शकते केसीसी KCC?
किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे स्वत च्या मालकीची शेती असावी. किंवा दुसऱ्याच्या शेतात काम करत असेल तर त्याच्याकडे जमिनीचा कस करार असायला हवा. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय हे १८ वर्ष ते ७५ वय वर्ष असावे. ६० वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या अर्जदारास सह अर्जदार आवश्यक असतो. यासह अर्जदार हा आपल्या नातेवाईकांमधील असावा आणि त्याचे वय हे ६० वर्षापेक्षा कमी असावे.
केसीसीसाठी बँका वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी करत असतात. परंतु काही कागदपत्रे असतात ती आपल्याकडे नक्कीच असावीत. यात आहेत. ओळखपत्र आणि रहिवाशी दाखल्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आईडी कार्ड, वाहनचालक परवाना. यासह अर्जदाराचा एक पासपोर्ट साईज फोटोग्राफ हवा. अनेक बँका केसीसीसाठी ऑनलाईन सुविधाही देत आहेत.
Published on: 08 June 2020, 12:24 IST