शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेतर्गंत शेतकऱ्यांना २ हजार रुपयांचा पहिला हफ्ता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भेटणार आहे. सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हा पैसा पाठवणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी गुरुवारी दिली. कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
यामुळे साधारण ८.६९ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार असून सरकार गरीब जनतेसाठी अनेक निर्णय घेत असल्याचे त्या म्हणाल्या. अर्थमंत्र्यांनी लॉकडाऊन लागू झाल्यानंतर ३६ तासात मोठ्या घोषणा केल्या आहेत. पंतप्रधान शेतकरी योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ६ रुपये दिले जातात. 'आम्ही याचा पहिला हफ्ता हा आधीच देऊ, जेणेकरून शेतकऱ्यांना वित्त वर्षाच्या सुरुवातीलाच २ हजार रुपये मिळतील', असे त्या म्हणाल्या. या निर्णयामुळे ८.६९ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. बळीराजा १३० कोटी जनतेसाठी अन्न उत्पादित करत असतो. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतून केंद्र सरकार शेतकऱ्यांना प्रत्येक अर्थिक वर्षात तीन हफ्त्यात योजनेची रक्कम देत असते. हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जातो.
Published on: 27 March 2020, 01:13 IST