News

लॉकडाऊनमुळे शेतीमालाच्या विक्रीतील अडचण सोडविण्यासाठी थेट शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किंमतीने कडधान्ये, तेलबिया खरेदी सुरू झाली आहे. आतापर्यंत १.१४ लाख शेतकऱ्यांकडून ७८४ कोटी रुपयांची कडधान्ये आणि तेलबियांची खरेदी झाल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश. आणि हरियाणमध्ये शेतकऱ्यांकडून एमएसपी दराने कडधान्ये आणि तेलबियांची खरेदी केली जात आहे.

Updated on 19 April, 2020 2:48 PM IST


लॉकडाऊनमुळे शेतीमालाच्या विक्रीतील अडचण सोडविण्यासाठी थेट शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किंमतीने कडधान्ये, तेलबिया खरेदी सुरू झाली आहे. आतापर्यंत १.१४ लाख शेतकऱ्यांकडून ७८४ कोटी रुपयांची कडधान्ये  आणि तेलबियांची खरेदी झाल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.  महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश. आणि हरियाणमध्ये  शेतकऱ्यांकडून एमएसपी दराने कडधान्ये आणि तेलबियांची खरेदी केली जात आहे. नाफेड, एफसीआय  यासारख्या केंद्रीय संस्थांच्या  माध्यमातून २०२०-२१  च्या रबी हंगामासाठी एमएसपी  दराने धान्य खरेदी सुरू आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन गुरुवार पर्यंत १,३३,९८७.६५ मेट्रकि टन कडधान्यांची तर २९.२६४ मेट्रिक टन तेलबियांची अशी एकूण ७४७.७७ कोटी रुपयांची खरेदी झाली आहे. १ लाख १४ हजार ३३८ शेतकऱ्यांना ७४७.७७ कोटी रुपयांची खरेदी सरकारी यंत्रणांनी केली आहे. तर मूल्य समर्थन योजनेद्वारे ९७३३७.३५ टन डाळी आणि तेलबियांची खरेदी लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर करण्यात आली.  दरम्यान डाळींचा बफरसाठा तयार करण्यासाठी देखील मूल्य स्थिरीकरण निधीअंर्गत  एमएसपी दराने महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामधून  तूर खरेदी सुरू आहे. २०१९-२० च्या खरीप हंगामातील ५, ३२, ८४९ मेट्रिक टन  तुरीची खरेदी झाली. दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये  १५ एप्रिलपासून सरकारकडून गव्हाची  खरेदी सुरू झाली आहे.  कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सोशल डिस्टंन्सिग पाळली जात आहे.सरकारने गव्हाचा किमान समर्थन किंमत प्रति क्विंटल १९२५ रुपये ठेवली आहे. यंदा यूपी सरकारने 55 लाख मेट्रिक टन गहू खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

English Summary: government start Purchase food grain from direct farmer
Published on: 19 April 2020, 02:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)