राष्ट्रीय कृषी बाजार ई-नाम ला अधिक प्रभावशाली बनविण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गुरुवारी तीन नवीन सुविधा लॉन्च केल्या आहेत. या सुविधांमुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असून बळीराजाला शेतमाल विकण्यासाठी मंडई बाजारात येण्याची गरज भासणार नाही. शेतमाल गोदामात ठेवून पण विकाता येणार आहे. दरम्यान कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन चालू आहे. त्यापार्श्वभूमीवर हे फायदेशीर ठरणार आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लॉन्च केलेले सॉफ्टवेअर मॉडल काय आहे, याची माहिती घेऊ...
ई- नाममध्ये गोदामात व्यापार करण्याची सुविधा आखण्यात आली असून त्यासाठी ट्रेडिंग मॉडल आहे. एफपीओचे ट्रेडिंग मॉडल जेथे एफपीओ संग्रहातून शेतमालाला बाजारात न आणताच त्याचा व्यापार करता येईल. मंडई आणि राज्याबाहेरील व्यापारची सुविधेसह लॉजिस्टिक मॉडलची नवी आवृत्ती असून याच्याशी साधारण ३ लाख ७५ हजार ट्रक जोडले जातील. ई- नाम पोर्टलने शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे. वाहतुकीच्या या सुविधेमुळे शेवटच्या ग्राहकांपर्यंत शेतीमाल शीघ्रते पोहोचण्यास मदत होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ई-नाम पोर्टलची सुरुवात १४ एप्रिल २०१६ मध्ये करण्यात आली होती. याला अपडेट करण्यात आले असून अधिक उपयुक्त करण्यात आले आहे. यात १६ राज्य आणि दोन केद्र शासित राज्यातील ५८५ मंडईंना जोडण्यात आले आहे. यासह अजून ४१५ मंडईंना जोडण्यात येणार असल्याने या पोर्टलवर एकूण एक हजार मंडई जोडल्या जातील. ई-नाम वरील सुविधेमुळे शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना मंडईला चक्कर मारण्याची गरज राहणार नसल्याचे केंद्रीय कृषी मंत्री तोमर यांनी सांगितले. कोरोना व्हायरसविरुद्धाच्या लढाईमध्ये सोशल डिस्टन्सिग पाळवा लागणार असल्याने त्यासाठी हे फायदेशीर असणार आहे. कोविड - १९ च्या विरुद्धात होत असलेल्या या लढाईत हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कारण आपल्या शेताच्या बांधावरुनच आपण आपल्या शेतमालाची विक्री करु शकणार असल्याचेही तोमर म्हणाले.
अल्पभूधारकपासून ते श्रीमंत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर
फळे, भाजीपाला याची पुरवठा साखळी व्यवस्थित ठेवण्यासाठी मंडई या महत्त्वाच्या असतात. या नव्या सुविधेमुळे अल्पभूधारक आणि श्रीमंत शेतकरी या दोघांना फायदा होणार आहे. परवानाधारक गोदामात ते आपला शेतमाल ठेवू शकता. इतर वाहतूकीचा खर्च वाचवून आपले उत्पन्न वाढवू शकणार आहेत. देशातील मोठ - मोठ्य़ा मंडईमध्ये आपला शेतमाल पोहोचू शकणार आहेत. वेळेवर मिळणारे दर आणि जागेवरुन होणाऱ्या विक्रीमुळे शेतकरी फायद्यात राहतील, असेही तोमर म्हणालेत.
ई-नाम पोर्टलवर ऑनलाईन पेमेट करण्याची सुविधा
एफपीओच्या बोलीसाठी आपल्या संग्रह केंद्रांना आपल्या शेतमालाला अपलोड करण्यासाठी सक्षम बनवा लागेल. यामुळे बोली लावण्यापुर्वी आपल्या शेतमालाची प्रत जाणून घेण्यास आधार केंद्रातून शेतमाल आणि गुणवत्ता मानकांचा फोटो अपलोड करु शकतात. एफपीओत बोली लावल्यानंतर मंडईच्या आधारावर आपल्या शेतमालाच्या वितरणाचा पर्याय असेल. यामुळे वाहतूक कमी होईल आणि आपला खर्च वाचेल. ऑनलाईन पेमेट करता येईल. बाजार मंडईंना शेतकरी आणि इतरांची सुरक्षा व्हावी यासाठी अत्याधुनिक स्वच्छता आणि सोशल डिस्टंन्सिग राखावे, असा सल्लाही तोमर यांनी दिला.
Published on: 04 April 2020, 02:34 IST