News

नांदेड: कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत हंगाम 2018-19 साठी कापूस खरेदी केंद्र मे. मनजित कॉटन प्रा. लि. भोकर येथे केंद्र शासनाच्या किंमत आधारभूत किंमतीनुसार सीसीआयचे सब एजंट म्हणून कापूस पणन महासंघाची 20 नोव्हेंबर 2018 रोजी स्थानिक संचालक नामेदवराव केशवे यांच्या हस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

Updated on 21 November, 2018 7:17 AM IST


नांदेड:
कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत हंगाम 2018-19 साठी कापूस खरेदी केंद्र मे. मनजित कॉटन प्रा. लि. भोकर येथे केंद्र शासनाच्या किंमत आधारभूत किंमतीनुसार सीसीआयचे सब एजंट म्हणून कापूस पणन महासंघाची 20 नोव्हेंबर 2018 रोजी स्थानिक संचालक नामेदवराव केशवे यांच्या हस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

कापूस खरेदी केल्यावर शेतकऱ्यांना अदा करावयाची रक्कम आरटीजीएसने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे खरीप हंगाम 2018-19 मधील कापूस पेऱ्याची अद्यावत नोंद असलेला सातबारा उतारा, आयएफएससी कोड असलेले बँकेच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स व आधारकार्डची मूळ प्रत व शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर आदी कागदपत्रे सोबत आणावीत. जेणे करुन शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी अडचण निर्माण होणार नाही, असे आवाहन कापूस उत्पादक पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक अे. व्ही. मुळे यांनी केले आहे.

English Summary: Government start cotton procurement
Published on: 20 November 2018, 08:41 IST