News

या विकास रथाच्या माध्यमातून गावागावांतील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती होणार असून वेगवेगळ्या योजनांच्या लाभासाठीचे फॉर्मस् सुद्धा यावेळी भरून घेतले जाणार आहेत. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांचे के.वाय.सी संदर्भातील तसेच योजनांच्या बाबतीतील अडचणी व शंका यांचे निरसन सुद्धा जागेवर केले जाणार असल्याचे केद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी यावेळी सांगितले.

Updated on 16 November, 2023 10:36 AM IST

नाशिक : आदिवासी समाजातील वीरांनी देशासाठी दिलेले बलिदान व त्यागाची आपल्याला कायम प्रेरणा मिळत रहावी यासाठी जनजातीय गौरव दिन गेल्या तीन वर्षापासून साजरा करण्याचे आवाहन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करीत आहेत. जनजातीय गौरव दिनाचे औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेचा शुभारंभ देशभरातून झाला आहे. या यात्रेचा रथ गावोगावी जावून विकासाच्या विविध शासकीय योजनांचा जागर होणार आहे असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी केले.

आज दिंडोरी तालुक्यातील ननाशी ग्रामपंचायत येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमास राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जून गुंडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी जितिन रहेमान, माजी आमदार धनराज महाले, एन.डी.गावित, जिल्हा अधिक्षक

कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) वर्षा फडोळ, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी प्रतिभा संगमनेरे, लीड बँक मॅनेजर आर.आर.पाटील, महाराष्ट्र बँकेचे जनरल मॅनेजर दिनेश तांबट, तहसिलदार पंकज पवार, गट विकास अधिकारी दिंडोरी नम्रता जगताप आदि उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार म्हणाल्या, कृषी विभाग, आरोग्य विभाग, महसूल विभाग व इतर विभाग यांच्या माध्यमातून शेतकरी, महिला, युवा यांच्यासाठी असणाऱ्या योजना गावागावात पोहचण्यासाठी हा विकास यात्रा रथ गावोगावी फिरणार आहे.

या विकास रथाच्या माध्यमातून गावागावांतील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती होणार असून वेगवेगळ्या योजनांच्या लाभासाठीचे फॉर्मस् सुद्धा यावेळी भरून घेतले जाणार आहेत. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांचे के.वाय.सी संदर्भातील तसेच योजनांच्या बाबतीतील अडचणी व शंका यांचे निरसन सुद्धा जागेवर केले जाणार असल्याचे केद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी यावेळी सांगितले.

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाखांचा आरोग्य विमा लाभार्थ्यांना मिळत आहे. उज्वला योजनेच्या माध्यमाजून 9 करोड पेक्षा जास्त गॅस कनेक्शन्स महिलांना उपलब्ध करून मिळाले आहे. शेतकरी सन्मान योजनेचा लाभही शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेला आहे. यासारख्या अनेक योजनांची माहिती ही विकास यात्रा रथाच्या माध्यमातून देशभरातील गावागावात पोहचणार आहे. यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री डॉ. अजून मुंडा, केंद्रीय स्वास्थ व परिवार कल्याण मंत्री मुनसुख मांडविया, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यावेळी मानले.

English Summary: Government schemes will be awakened through the Evanshak Bharat Sankalp Yatra What are the plans
Published on: 16 November 2023, 10:36 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)