विधानपरिषदेच्या निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय परीस्थिती पाहतानागरिकांनी व मतदारांनी काय धडा घ्यायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.राजकीय पक्ष व नेत्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांनी कोणता धडा घ्यायचा हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.अशा घटनांमुळे राजकीय पक्ष मतदारांमधून आपली लोकप्रियता गमावून बसनार हे मात्र नक्की आहे.कोरोनासारखी भयंकर परीस्थिती अत्यंत उत्तम प्रकारे हाताळणारे सरकार म्हणून महाविकास आघाडीकडे पाहिले जाऊ लागले होते नागरिकांना व मतदारांना त्यांच्याबद्दल आपुलकी व आशेचा कीरण दिसत होता
परंतु सत्ताकारण आले आणि महाराष्ट्रात राजकीय भुकंप झाला त्यामुळे मतदार, नागरिक व तरुणांमध्ये सरकारप्रती नकारात्मक भाव निर्माण व्हायला सुरुवात झाली २८८ आमदार हे स्वबळावर कधीच आमदार नसतात त्यांना तीथपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक अद्रुष्य शक्ती व कार्यकर्ते असतात मग ज्यावेळी असा बिकट प्रसंग येतो त्यावेळी त्या आमदारांनी अशांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचा असतो परंतु तसे घडताना आजपर्यंत दिसले नाही म्हणून काही व्यक्ती दुसर्यांदा निवडून येत नाहीत त्यात अशाच अद्रुष्य शक्तीचा हात असतो म्हणून त्यांना दुसर्यांदा निवडून येऊ दिल्या जात नाही.
कोरोनासारखी भयंकर परीस्थिती अत्यंत उत्तम प्रकारे हाताळणारे सरकार म्हणून महाविकास आघाडीकडे पाहिले जाऊ लागले होते नागरिकांना व मतदारांना त्यांच्याबद्दल आपुलकी व आशेचा कीरण दिसत होता परंतु सत्ताकारण आले आणि महाराष्ट्रात राजकीय भुकंप झाला त्यामुळे मतदार, नागरिक व तरुणांमध्ये सरकारप्रती नकारात्मक भाव निर्माण व्हायला सुरुवात झाली २८८ आमदार हे स्वबळावर कधीच आमदार नसतात त्यांना तीथपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक अद्रुष्य शक्ती व कार्यकर्ते असतात मग ज्यावेळी असा बिकट प्रसंग येतो त्यावेळी त्या आमदारांनी अशांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचा असतो परंतु तसे घडताना आजपर्यंत दिसले नाही
कालपासून घडणाऱ्या घटनाक्रमात सर्वसामान्य नागरिक व मतदारांचा विचार कुणीही केला नाही हे यावरून स्पष्ट दिसून येते.सत्ता स्थापनेसाठी साम,दाम,दंड,भेदाचा वापर प्रत्येक पक्ष करताना दिसतो त्यात मिडिया सुद्धा ते हाताशी धरून ठेवतात वास्तविक पाहता मिडिया म्हणजे तिसरा डोळा,लोकशाहीचा आधारस्तंभ आहे परंतु अशावेळी जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून सत्तेसाठी वाट्टेल ते करणाऱ्यांनाच कवर करत असतात. म्हणून नागरिकांना यक्ष प्रश्न पडतो देशात खरी लोकशाही आहे का ?जनतेचे,विकासाचे,तरुणांचे,रोजगाराचे,महागाईचे ईत्यादी प्रश्न कुणासाठीच महत्त्वाचे नाही का ?
- अमोलपाटील भारसाकळे
रा.गणोरी मो.९९२१५७९१८२
Published on: 22 June 2022, 04:58 IST