News

कोरोना महामारीमुळे राज्यात बऱ्याच दिवसांपासून कुठल्याच प्रकारच्या नोकर भरत्या झालेल्या नाहीत. सध्या सरकार हळुहळू सगळे व्यवहार पूर्वपदावर आणत असताना अनेक गोष्टी सुरू करत आहे. त्यात मुख्य म्हणजे शासनाच्या विविध विभागातल्या रिक्त जागांची पद भरती करण्यात येणार असल्याचे दिसत आहे.

Updated on 24 October, 2020 4:44 PM IST


कोरोना महामारीमुळे राज्यात बऱ्याच दिवसांपासून कुठल्याच प्रकारच्या नोकर भरत्या झालेल्या नाहीत.  सध्या सरकार हळुहळू सगळे व्यवहार पूर्वपदावर आणत असताना अनेक गोष्टी सुरू करत आहे. त्यात मुख्य म्हणजे शासनाच्या विविध विभागातल्या रिक्त जागांची पद भरती करण्यात येणार असल्याचे दिसत आहे.

मागच्या काही दिवसांमध्ये राज्याचे गृहमंत्री माननीय अनिल देशमुख यांनी डिसेंबरपर्यंत पोलीस पदासाठीची महाभरती पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी महापारेषण या कंपनीत तब्बल साडेआठ हजार जागांची मेगा भरती करण्यात येणार असल्याचे घोषणा केली आहे. त्यामुळे हजारो बेरोजगार तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. महापारेषण कंपनीत टेक्निकल श्रेणीतील सुमारे ८ हजार ५०० पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरात लवकर सुरू होणार आहे. यामध्ये तांत्रिक संवर्गातील ६ हजार ७५० रिक्त जागा व इंजिनियर्स संवर्गातील १ हजार ७६५ पदांसाठीची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापनाला तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहे, असे आदेश नितीन राऊत यांनी शुक्रवारी दिले आहेत.

नव्याने होणाऱ्या पद भरतीत आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध होणार आहे. तसेच या भरतीचा फायदा अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारकांना नाही होणार आहे. या अनुषंगाने महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी पद भरती संबंधीचा प्रस्ताव सादर केला आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत ऊर्जामंत्री राऊत यांनी ही पद भरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश विभागाला दिले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य शासनास नव्या मंजुर पदांचा आकृतीबंध सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. या निर्णयामुळे आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरीची मोठी संधी उपलब्ध होत असल्याने तरुणांनी भरती प्रक्रियेच्या तारखा आणि परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

English Summary: Government Job Opportunities - Bumper Recruitment in Mahapareshan
Published on: 24 October 2020, 04:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)