News

नवी दिल्ली: कोविड-19 या आजाराला आळा घालण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बाधित कृषी क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी सरकारने कृषी आणि संलग्न वस्तूंच्या निर्यातदारांशी चर्चा सुरु केली आहे.

Updated on 16 April, 2020 6:39 AM IST


नवी दिल्ली:
कोविड-19 या आजाराला आळा घालण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बाधित कृषी क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी सरकारने कृषी आणि संलग्न वस्तूंच्या निर्यातदारांशी चर्चा सुरु केली आहे. कृषी आणि संलग्न वस्तूंच्या निर्यातदारांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि सध्याच्या कोविड-19 संकटानंतरही त्यांना तग धरून उभे राहण्यात मदत करण्यासाठी हस्तक्षेप करून आवश्यक ती पावले उचलण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि कृषीसहकार आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव संजय अग्रवाल यांनी काल नवी दिल्लीत एक व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली. 

फळेभाजीपालाबासमती आणि बिगर-बासमती तांदूळबियाणेफुलेवनस्पतीसेंद्रिय उत्पादनकृषी उपकरणे आणि यंत्रसामग्री यासारख्या कृषी उत्पादनाचे निर्यातदारउत्पादक/निर्यातदार संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी विविध सामान्य आणि क्षेत्रनिहाय समस्या मांडल्या. मजुरांची उपलब्धता आणि त्यांची ने-आणआंतरराज्यीय वाहतुकीतील अडथळेमंडी बंद असल्यामुळे कच्च्या मालाचा तुटवडा, फायटो-सॅनिटरी प्रमाणीकरणकुरिअर सेवा बंद असल्यामुळे कागदपत्रे पाठवण्यावर आलेली बंधनेमालवाहतूक सेवांची उपलब्धताबंदरे/यार्डांमध्ये प्रवेश आणि आयात-निर्यातीसाठी वस्तूंना मंजुरी आदी मुद्दे निर्यातदारांनी अधोरेखित केले.

अन्न प्रक्रियामसालेकाजू आणि यंत्र तसेच उपकरणे (एम अँड ई) क्षेत्रांशी संबंधित उद्योगांच्या प्रतिनिधींनी किमान 25-30% कर्मचाऱ्यांच्या बळावर  उद्योग सुरु करण्यासाठी परवानगी मागितली आणि उद्योगांकडून त्यांच्या कामकाजात योग्य आरोग्यविषयक सूचनांचे पालन केले जाईल असे आश्वासन दिले. गृह मंत्रालयाकडून अंतर्गत वाहतुकीची समस्या सोडवली जात आहे आणि आवश्यक निर्देश जारी केले जात आहेत. फायटो-सॅनिटरी प्रमाणपत्र निरंतर/नियमित जारी करण्यासाठी तसेच ऑनलाईन प्रमाणपत्रे स्वीकारण्यासाठी सूचनाही देण्यात आल्या आहेत.

बंदरसागरी मार्गाने मालवाहतूककुरिअर सेवांशी संबंधित समस्यांवर आवश्यक तोडगा काढण्याबाबत विचार केला जाईल. उद्योगांचे कामकाज पुन्हा सुरू करण्याची आणि क्षेत्रनिहाय समस्या सोडवण्याबाबत नरेंद्र सिंह तोमर यांना विनंती केली जाईल आणि योग्य तो तोडगा काढण्यात येईलअशी ग्वाही त्यांनी दिली.

भारत कृषी आणि संलग्न वस्तूंचा निर्यातदार आहे. सन 2018-19 मध्ये भारताची कृषी आणि संलग्न निर्यात 2.73 लाख कोटी रुपये होती आणि हे क्षेत्र व्यापार संतुलनात नेहमीच सकारात्मक राहिले आहे. निर्यात ही फार महत्वाची गोष्ट आहे कारण देशासाठी मौल्यवान परकीय चलन मिळवण्याबरोबरच कृषी निर्यातीमुळे शेतकरी/उत्पादक/निर्यातदारांना व्यापक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा लाभ उठवण्यास आणि त्यांचे उत्पन्न वाढविण्यात मदत होते. निर्यातीमुळे कृषी क्षेत्राचे क्षेत्रफळ आणि उत्पादकता वाढून उत्पादनही वाढले आहे.

English Summary: Government initiates dialogue to resurrect agri sector exports in the aftermath of current covid-19 crisis
Published on: 15 April 2020, 06:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)