News

पुणे : भारत -चीन सीमावादाचा फटका शेतीला बसला असून भारताने चीनमधून होणाऱ्या पॉवर टिलरच्या आयातीवर निर्बंध घातले आहे. त्यामुळे शेती व्यवसाय काही काळासाठी अडचणीत सापडला आहे. शेतीची कामे ही आता यंत्राच्या साहाय्याने केली जात आहेत. शेतीच्या कामात पॉवर टिलरचा मोठा उपयोग होत असतो.

Updated on 11 August, 2020 9:08 PM IST


पुणे  : भारत -चीन सीमावादाचा फटका शेतीला बसला असून भारताने चीनमधून होणाऱ्या पॉवर टिलरच्या आयातीवर निर्बंध घातले आहे.  त्यामुळे  शेती व्यवसाय काही काळासाठी अडचणीत सापडला आहे.  शेतीची कामे ही आता यंत्राच्या साहाय्याने केली जात आहेत. शेतीच्या कामात पॉवर टिलरचा मोठा उपयोग होत असतो.  परंतु चीनमधून येणाऱ्या पॉवर टिलरला भारतीय बाजारपेठांचा दरवाजा बंद झाला आहे. दरम्यान सरकारने देशी पॉवर टिलरला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

पॉवर टिलर हे एक शेती यंत्र आहे, जे शेताच्या नांगरणीपासून ते पिकाची कापणीपर्यंतच्या कामांसाठी  खूप उपयुक्त आहे.   नांगरात जशी पेरणी सरळ रेषेत केली जाते त्याचप्रमाणे या मशीनद्वारे पेरणी केली जाते.  विशेष गोष्ट अशी आहे की, पॉवर टिलरमध्ये आणखी एक कृषी यंत्र जोडल्यास याची  बर्‍याच गोष्टींमध्ये मदत घेतली जाऊ शकते. पॉवर टिलर ट्रॅक्टरपेक्षा खूप हलके नसते.  पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनावर पॉवर टिलर  चालवता येते.

पॉवर टिलरने होणारी कामे

  • शेतकर्‍यांची बरीच कामे सुलभ होतात
  • हे यंत्र नांगरणी ते पेरणीसाठी उपयुक्त आहे.
  • पॉवर टिलरमध्ये वॉटर पंप टाकून शेतकरी तलावातील, आणि नदी इत्यादीमधून पाणी काढू शकतो.
  • थ्रेशर्स, कापणी करणारे, लागवड करणारे, बियाणे धान्य पेरण्याचे यंत्र, इत्यादी देखील यात जोडल्या जाऊ शकतात.
  • पॉवर टिलर हे खूप हलके मशीन आहे, याची वाहतूक आपण कुठेही करु शकतो.

दरम्यान, भारतात शेतीच्या यांत्रिकीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पॉवर टिलरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पॉवर टिलर प्रकारात केवळ दोनच कंपन्या आहेत. त्यामुळे त्याची मोठया प्रामान्य आयात होते. आता सरकारने हा निर्णय घेतल्याने भात उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे आहेत. जागतिकीकरण्याच्या या प्रक्रियेत  सर्वच देशांचे  एकमेकांवरील अवलंबत्व वाढले आहे. त्यामुळे पैशापासून अवजारांपर्यंत सर्वच गोष्टींची मुक्त  वाहतूक सुरू आहे. आता भारत आणि चीनच्या सीमावादाने तोंड वर काढल्याने या प्रक्रियेला खीळ बसली आहे.  भारताने चीनला  धडा शिकवण्याचा  निर्णय  घेतला आहे. य सगळयात शेती क्षेत्र अडकले आहे.  देशात पॉवर टिलरची मागणी मोठया प्रमाणात वाढत  असताना हा निर्णय शेतकरी वर्गाला चिंतेत पाडणारा आहे.

English Summary: Government imposes restrictions on power tiller imports
Published on: 11 August 2020, 09:07 IST