भारतात सध्या जैविक शेतीला प्रोत्साहित करण्यासाठी सरकारद्वारे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत, वैश्विक पातळीवर देखील जैविक शेतीला चांगलाच बढावा देण्यात येत आहे. जैविक शेती ही काळाची गरज बनली आहे, जैविक औषधांचा वापर हा जमिनीचा पोत सुधारण्यासाठी पिकासाठी तसेच मानवी आरोग्यासाठी चांगला असल्याचा दावा केला जातो पण रासायनिक औषधांचा वापर हा जमीन नापीक करण्यात कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले जाते शिवाय रासायनिक औषधांचा वापर हा मानवी आरोग्यासाठी देखील घातक असल्याचे सांगितले जाते, तसेच रासायनिक औषधे फवारून घेण्यात आलेले उत्पादन हे मानवाने सेवन केल्यास त्याला गंभीर आजार होण्याची शक्यता असते. म्हणून भारतात खतरनाक रासायनिक औषधे सरकारने बंद करण्याचे ठरविले आहे, आता अशी बातमी समोर येत आहे की सरकारने दोन कीटकनाशक ही बंद केली आहेत. स्ट्रेपटोमाइसिन आणि टेरासाइक्लिन अशी औषधांची नावे असून आता हे औषध ते 2024 पासून बाजारातून पूर्णतः गायब होतील. कृषी वैज्ञानिकांच्या मते हे औषधे टोमॅटो आणि सफरचंद या पिकांवरती उपयोगात आणले जात होते. आता भारतातील कंपन्या या औषधांची 2024 पासून विक्री करू शकत नाही. या दोन्ही औषधांमध्ये टोमॅटो आणि सफरचंद पिकावर येणाऱ्या कीड-रोगांपासून अटकाव करण्याची पूर्ण क्षमता आहे, असे असले तरी यामुळे पिकाचे उत्पादन तर वाढते पण त्याचा मानवी आरोग्यावर खूप घातक परिणाम होतो असे सांगितले जात आहे.
भारत सरकारने याआधी तब्बल 27 कीटकनाशकांना खतरनाक म्हणून प्रतिबंधित केले होते. परंतु अनेक औषध कंपन्यांची एक मोठी लॉबी भारतात तयार झाली आहे त्याच्या दबावामुळे सरकारचा हा निर्णय अद्याप पर्यंत अंमलात येऊ शकलेला नाही. या औषधांमुळे होणाऱ्या फायद्याचे आणि नुकसानीचे सर्वेक्षण सरकार द्वारे केले जात आहे. जर यामुळे मानवी आरोग्यास धोका उत्पन्न होत असेल तर ही औषधे सुद्धा होऊ शकतात असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. सध्या दोन औषधे प्रतिबंधित केली जाणार याविषयी चर्चा रंगली आहे.
असे सांगितले जात आहे की केंद्र सरकारने एक फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून या दोन्ही औषधांची निर्माण प्रक्रिया आणि आयात करण्यावर पूर्णतः बंदी घातली जाईल. आता ज्या औषध कंपन्यांकडे याचे रॉ मटेरियल अर्थात कच्चामाल उपलब्ध आहे त्याच लोकांना याचे निर्माण करता येणार आहे आणि याचा सेल 2024 पर्यंत करता येणार आहे. त्यानंतर मात्र या देखील कंपन्यांना याचे प्रॉडक्शन करता येणार नाही.आम्ही आपणास सांगू इच्छितो की हे दोन औषधे बनवणार्या कंपन्या 2022 पर्यंत याचे प्रोडक्शन करतील आणि यांचा सेल 2024 पर्यंत करू शकतील या नंतर त्याच्यावर बंदी असेल. ये दोन्ही औषधे बुरशीनाशक तसेच आणि हानीकारक जीवाणु नाशक आहेत.
या दोन औषधांना प्रतिबंध करण्याची मागणी केंद्रीय कीटकनाशक बोर्ड यांनी 2020 मध्येच केली होती. बोर्डच्या अधिकारीनुसार हे दोन्ही औषधी टोमॅटो आणि सफरचंद पिकांना उत्पादन वाढीसाठी कारगर सिद्ध होतात पण यामध्ये असणारे खतरनाक कन्टेन्ट हे मानवी आरोग्याला घातक आहेत, या दोन्ही औषधांचा प्रयोग हा बटाटे आणि भात पिकावर देखील मोठ्या प्रमाणात केला जात होता
Published on: 21 December 2021, 11:39 IST