News

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांना याचा दिवाळीच्या तोंडावर आर्थिक फटका बसला. असे असताना आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने मदत जाहीर केली आहे. हातातोंडाशी आलेलं पीक गेल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाल्याने याबाबत सरकारकडे मदतीची मागणी करण्यात आली होती.

Updated on 03 November, 2022 9:32 AM IST

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांना याचा दिवाळीच्या तोंडावर आर्थिक फटका बसला. असे असताना आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने मदत जाहीर केली आहे. हातातोंडाशी आलेलं पीक गेल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाल्याने याबाबत सरकारकडे मदतीची मागणी करण्यात आली होती.

आता नुकसान भरपाई म्हणून आतापर्यंत 4 हजार 700 कोटी रुपयांची मदत केल्याची माहिती देण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच आता जे शेतकरी मदतीपासून वंचीत आहेत. त्यांना देखील मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ऑक्टोबरमध्ये पावसाने झालेल्या नुकसानीसाठी सुद्धा मदत देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला.

यामुळे आता उर्वरित शेतकऱ्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे. सध्या राज्यात अवकाळी पावसामुळे 25 लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. आजपर्यंत कधीही सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जात नव्हती. मात्र आता याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली.

आता लम्पीनंतर घोड्यांमध्ये ग्लेंडर्स रोगाचा शिरकाव, माणसांना देखील धोका,संसर्ग झाल्यास थेट मृत्यू..

यासाठी सुमारे 750 कोटी रुपये इतके वाटप करण्यात आले आहे. तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. जून-जुलै पासून सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या 40 लाख 15 हजार 847 शेतकऱ्यांना सुमारे 4700 कोटींची मदत करण्यात आली आहे.

मराठवाडा टँकरमुक्त! पाण्याचा प्रश्न मिटला, भूजल पातळीत 2 मीटरची वाढ

दरम्यान, केलेली ही मदत एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीने जास्त व दोन ऐवजी तीन हेक्टर अशी वाढीव आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. दरम्यान, मागच्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला होता. यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन करून मदतीची मागणी केली होती.

महत्वाच्या बातम्या;
काय सांगता! आता पिकाचे भविष्य आधीच कळणार, पितळे बंधूंचे अनोखे स्टार्टअप
इथेनॉलच्या किमती वाढणार, खतांवर सबसिडीही मिळणार, शेतकऱ्यांना दिलासा..
एकाच दिवसात टोमॅटो 80 रुपयांवरुन 25 ते 30 रुपयांवर, शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी..

English Summary: government announced help relief farmers losses unseasonal rains..
Published on: 03 November 2022, 09:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)