News

शेतकऱ्यांसाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी यावर सरकारच भर आहे. शेती संबंधित अनेक यंत्रे घेण्यासाठी सरकार अनुदान देत आहे. सरकार शेतकऱ्यांना अनुदान देऊन प्रोत्साहन देतं आहे.

Updated on 05 April, 2022 10:17 AM IST

शेतकऱ्यांसाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी यावर सरकारच भर आहे. शेती संबंधित अनेक यंत्रे घेण्यासाठी सरकार अनुदान देत आहे. सरकार शेतकऱ्यांना अनुदान देऊन प्रोत्साहन देतं आहे.

सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवते, मात्र त्या योजनांचा लाभ कसा घ्यायचा ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही. आज आपण अशाच एका योजनेची माहिती घेणार आहोत.

ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीसाठी सरकार देतंय 90 % अनुदान

ट्रॅक्टर हा आधुनिक शेतीचा अविभाज्य भाग आहे. ट्रॅक्टर सबसिडी ही शेतकऱ्यांच्या हितासाठीची एक योजना आहे. या योजनेसाठी 2022-23 करता महाडिबी पोर्टल स्कीमच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. विशेष म्हणजे 90 % अनुदानान दिले जात आहे.

त्यामुळे सरकारकडून देण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा. सर्वसामान्य नागरिक तसेच आर्थिक स्थिती हलाखीची असलेल्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्रॉली सारखी महागडी उपकरणं घेता येत नाहीत. हीच अडचण ओळखून केंद्र सरकारने ही योजना सुरु केलेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
मोठी बातमी : बनावट शेतीमालाची विक्री केल्यास आता जेलची हवा खावी लागणार
Tata Electric Car: टाटाची ही गाडी चार्जिंगचे सगळे रेकॉर्ड मोडणार; जाणून घ्या कारचे फिचर आणि किंमत

असा करा अर्ज

ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीसाठी फॉर्म कुठे भरायचा किंवा कसा भरायचा याची सर्व माहिती घेणार आहोत. यासाठी तुम्हाला https://mahadbtmahait.gov.in/ या महाडीबीटी वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर फार्मर स्कीम नावाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची माहिती भरून ऑनलाईन अर्जाची पुढील प्रक्रिया तुम्ही करू शकता. आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता .

English Summary: Government 90% subsidy for purchase of new tractor trolley; Do this application
Published on: 05 April 2022, 10:07 IST