News

केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सिंचन योजना अंतर्गत सुषमा सिंचन योजनेच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. ठिबक व तुषार सिंचनासाठी असलेल्या खर्च मर्यादांमध्ये 10 ते 13 टक्यां व पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव अनुदान मिळेल अशी माहिती सूत्रांनी दिली.सरकारने ठिबक सिंचन व तुषार सिंचन यासाठीची खर्च मर्यादा व त्यावर द्यायचे अनुदान हे 2016 मध्ये निश्चित केले होते. यामध्ये बदल करावा अशी मागणी राज्यातील ठिबक उद्योग कृषी विभागाकडून सातत्याने होत होती. त्यानुसार केंद्र सरकारने त्यामध्ये बदल केले आहेत.

Updated on 19 October, 2021 10:24 AM IST

 केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सिंचन योजना अंतर्गत सुषमा सिंचन योजनेच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. ठिबक व तुषार सिंचनासाठी असलेल्या खर्च मर्यादांमध्ये 10 ते 13 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव अनुदान मिळेल अशी माहिती सूत्रांनी दिली.सरकारनेठिबक सिंचन व तुषार सिंचन यासाठीची खर्चमर्यादा व त्यावर द्यायचे अनुदान हे 2016 मध्ये निश्चित केले होते. यामध्ये बदल करावा अशी मागणी राज्यातील ठिबक उद्योग कृषी विभागाकडून सातत्याने होत होती. त्यानुसार केंद्र सरकारने त्यामध्ये बदल केले आहेत.

नवीन वाढीनुसार मिळणारे अनुदान

1.2 मिटर ×0.6 मीटर या लागवड अंतरासाठी एक ट्रॅक्‍टर व ठिबक संच बसवल्यास 2016 च्या नियमावलीनुसार एक लाख 12236 रुपये अनुदान मिळत होते. आता नवीन नियमावलीनुसार हे अनुदान एक लाख 27 हजार पाचशे एक रुपये मिळेल.तुषार संचासाठी 2016 च्या नियमावलीनुसार एक हेक्टर  साठी 19 हजार 542 रुपये अनुदान मिळत होते. आता नवीन नियमावलीनुसार याचा अनुदान 21 हजार 558 रुपये मिळेल. परंतु यामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी 55 टक्क्यांपर्यंत  व इतर शेतकऱ्यांसाठी 45 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान येण्याची पूर्वीचे निकष मात्र बदलण्यात आलेले नाहीत.

 या सूक्ष्म सिंचन अनुदान योजनेत  पर्यायी सामग्री ला देखील अनुदान मिळते. म्हणजेच खत टाकी, कचरा गाळणी, माती व अन्य जड घटक वेगळे करणारे उपकरण या प्रकारची पर्यायी सामग्री पूर्वी केंद्राचे अनुदान कक्षेत होती परंतु आता नवीन नियमानुसार सॅण्ड फिल्टर, हायड्रो सायक्लोन फिल्टर, फर्टिलायझर्स टॅक व ठिबक नळी गुंडाळणारी अवजार देखील आता या अनुदान कक्षात आले आहे.

 कोकण व पश्‍चिम महाराष्ट्र या विभागातील छोटे शेतकरी अर्धा एकरामध्ये देखील ठिबक संच बसवतात. परंतु पूर्वीच्या नियमावलीमध्ये छोट्या अंतरासाठी अनुदानाची तरतूद नव्हती. केंद्र शासनाला हा मुद्दा देखील  कळविण्यात आला होता. त्याला देखील केंद्राने मान्यता दिली असून आता नवीन अनुदान नियमावलीत दीड मीटर बाय दीड मीटर असे नवे अंतर ग्राह्य धरण्यात आल्यामुळे आता छोट्या शेतकऱ्यांना देखील एक लाख 21 हजार 556 रुपये हेक्टरी एवढे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

अशा पद्धतीने करण्यात आलेले अनुदान नियमात बदल

  • ठिबकसंचाचा खर्च मर्यादित 13.59 टक्के वाढ
  • तुषार असंच खर्च मर्यादेत 10.46 टक्क्यांनी वाढ
  • नवीन नियमावली अर्धा एकर क्षेत्राचा समावेश
  • अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी असलेल्या राखीव निधीत अर्धा टक्‍क्‍यांनी वाढ
  • ठिबक नळी गुंडाळणाऱ्या अवजार आला अनुदान

(माहिती संदर्भ- कृषी क्रांती)

English Summary: goverment growth in subsidy of micro irrigation set
Published on: 19 October 2021, 10:24 IST