News

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना मिळणाऱ्या मदत तर शासनाने वाढ केली त्यासोबतच पशुधनाचा मृत्यू झाल्यास देखील मिळणाऱ्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे. बरेचदा वन्य श्वापदांचा हल्ल्यामध्ये गाय, बैल आणि म्हशीसारख्या पशुधनाला जीव गमावण्याची वेळ येते व याचा मोठा फटका पशुपालकांना बसतो. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत म्हणून या माध्यमातून मिळणाऱ्या रकमेत वाढ केली आहे.

Updated on 25 August, 2022 10:10 AM IST

 वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना मिळणाऱ्या मदत तर शासनाने वाढ केली त्यासोबतच पशुधनाचा मृत्यू झाल्यास देखील मिळणाऱ्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे. बरेचदा वन्य श्वापदांचा हल्ल्यामध्ये गाय, बैल आणि म्हशीसारख्या पशुधनाला जीव  गमावण्याची वेळ येते व याचा मोठा फटका पशुपालकांना बसतो. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत म्हणून या माध्यमातून मिळणाऱ्या रकमेत वाढ केली आहे.

नक्की वाचा:Goverment Announcement: वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींना मिळणाऱ्या मदतीत 'इतकी'वाढ

नवीन निर्णयानुसार इतकी मिळेल मदत

 जर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये अगोदर पशुधनाचा मृत्यू झाला तर 60 हजार रुपये इतकी मदत देण्यात येत होती. परंतु त्यामध्ये आता दहा हजार रुपयांची वाढ करत ते 70 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे.

एवढेच नाहीतर मेंढी, शेळ्या यासारख्या इतर पशुधनाचा मृत्यू झाल्यास अगोदर दहा हजार रुपये एवढी मदत देण्यात येत होती परंतु यामध्ये पाच हजार रुपयांची वाढ करते आता पंधरा हजार रुपये करण्यात आले आहे.

नक्की वाचा:Sanen Goat: जास्त दूध उत्पादनासाठी सानेन शेळी ठरतेय अव्वल; पालनातून शेतकऱ्यांना मिळणार चांगले उत्पादन

गाय,म्हैस आणि बैल या जनावरांना या हल्ल्यात कायमचे अपंगत्व आल्यास देण्यात येणारी बारा हजार रुपयांची रक्कमेत वाढ करुन जाता पंधरा हजार रुपये करण्यात आली आहे वरील पैकी कोणतेही पशुधन जखमी झाल्यास देण्यात येणारी चार रुपये  रक्कम आता पाच हजार इतकी करण्यात आली आहे.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जी काही मनुष्यहानी होते त्यामुळे संबंधित कुटुंबाची खूप मोठी आर्थिक ओढाताण होते व या पार्श्‍वभूमीवर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेले निर्णय खूप महत्त्वपूर्ण असे आहेत.

नक्की वाचा:Milk Growth Tips: 'या' 4 पायऱ्यांचा आधार घेऊन चढा दूध उत्पादनवाढीची शिडी, नक्कीच मिळेल यश

English Summary: goverment growth in compansation ammount in cow,buffalo etc dead in wild animal attack
Published on: 25 August 2022, 10:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)