News

शेतकऱ्यांना केंद्र सरकार कडून एकामागून एक चांगल्या प्रकारच्या संधी उपलब्ध केल्या जातआहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता पशुपालन व्यवसाय ते औषधी वनस्पतींची शेती यासाठी वेगळ्या प्रकारची आर्थिक मदतीचे घोषणा केली आहे.

Updated on 25 September, 2021 11:16 AM IST

 शेतकऱ्यांना केंद्र सरकार कडून एकामागून एक चांगल्या प्रकारच्या संधी उपलब्ध केल्या जातआहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता पशुपालन व्यवसाय ते औषधी वनस्पतींची शेती यासाठी वेगळ्या प्रकारची आर्थिक मदतीचे घोषणा केली आहे.

 यासंबंधी माहिती देताना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, केंद्र सरकार ची एक लाख करोड रुपयांची अग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चरचीयोजना आहे. शेतीसोबतच शेतीतील असलेले जोडधंदा यांनादेखील केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे. ज्यामध्ये –

  • पशुपालनासाठी दहा हजार कोटी
  • मत्स्य व्यवसायासाठी 20 हजार कोटी
  • फुड प्रोसेसिंग उद्योगासाठी दहा हजार कोटी
  • औषधी वनस्पतींच्या शेतीला उत्तेजन देण्यासाठी चार हजार कोटी
  • मधुमक्षिका पालन व्यवसायासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद आहे.

सगळे  मिळून शेतकऱ्यांना मिळणार 1.5 लाख कोटी रुपये

 केंद्र सरकार नेदेशातील शेतकऱ्यांचा उत्साह वाढावा यासाठी मंजूर केलेल्या या निधीचा उपयोगपूर्ण  देशातील शेतकरी करू शकतील. यासाठी केंद्र सरकार देशातील राज्य सोबत चर्चा करीत आहेत. आतापर्यंत जवळजवळ दहा हजार कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी दिली गेली आहे.यामधून जवळ जवळ पाच हजार कोटींच्या योजनांना बँकांकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. सध्य परिस्थिती आणि गरजेनुसार काही योजनांमध्ये बदल केला गेला आहे.

 खाद्य तेलात ऐंशी हजार कोटीची आयात

 

 भारत सरकारने पाम तेला विषयी मोठा निर्णय घेतला आहे. क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या पाहता योजना बनवली गेली आहे.आपल्याकडील एकूण उपलब्ध खाद्य तेलामध्ये 56% वाटा हा पाम तेलाचा असतो त्यामुळे इतर तेलवर्गीय पिकांचे शेतीचे क्षेत्र वाढावे कारण पाम ऑइल च्या  शेतीला काही नुकसान न होता आणि या क्षेत्रात कुठल्याही प्रकारची कमी येऊ नये या उद्देशाने याची सुरुवात करण्यात आली आहे

English Summary: goverment give fund to develop to animal husbundry and medicinal plant
Published on: 25 September 2021, 11:16 IST