News

गेल्या दोन-तीन दिवसापासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धुमाकूळ घालूनपिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या अवकाळी पावसा सोबतच थंडीचा कडाका हि खूप प्रमाणात वाढला होता. या थंडीच्या कडाक्याचा फटका हा पशुधनाला देखील बसला

Updated on 04 December, 2021 10:36 AM IST

गेल्या दोन-तीन दिवसापासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धुमाकूळ घालूनपिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या अवकाळी पावसा सोबतच थंडीचा कडाका हि खूप प्रमाणात वाढला होता. या थंडीच्या कडाक्याचा फटका हा पशुधनाला देखील बसला

थंडीत गारठल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मेंढ्या दगावल्या. त्यामुळे पशुपालकांचे भरपूर प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. म्हणून राज्य शासनाने असे नुकसान झालेल्या पशु पालकांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

 अशा पद्धतीने दिली जाणार मदत

 एक डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे बऱ्याच ठिकाणी लहान मोठी जनावरे दगावली आहेत. यामध्ये सर्वात जास्त संख्या ही मेंढ्यांचे असून  पालकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

 याकरिता मदतीचे स्वरूप म्हणून, शेळी मेंढी करिता चार हजार रुपये, गायी करिता प्रत्येकी 40 हजार रुपये तर बैलांसाठी तीस हजार रुपये  नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. या संबंधात पशुसंवर्धन विभागाने पंचनामे पूर्ण केले असून प्रक्रिया पूर्ण होताच ही मदत तातडीने जमा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बारामती तालुक्याचा दौरा दत्तात्रय भरणे यांनी केला.त्यावेळी त्यांनी दगावलेल्या पशुधनाचा आढावा घेतला व शेतकऱ्यांचे हाल पाहताचत्यांनी या मदतीची घोषणा केली आहे.

 या नुकसानीची झळ सगळ्यात जास्त पुणे जिल्ह्याला बसली आहे.जर जुन्नर तालुक्याचा विचार केला तर या एकाच तालुक्‍यात 650 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे तर त्यानंतर आंबेगाव तालुक्यात 366 तर शिरूर तालुक्यात 341, पुरंदर तालुक्यात 131 तर खेड मध्ये 84 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

English Summary: goverment give compansation to mortality of animal in unsessional rain
Published on: 04 December 2021, 10:36 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)