News

अनेक राज्य सरकार आपल्या प्रांतातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काही ना काहीतरी योजना आणत असतात, अशीच एक योजना घेऊन छत्तीसगड सरकार आपल्या शेतकऱ्यांची मदत करतेय, छत्तीसगड सरकार चक्क शेतकऱ्यांकडून शेण खरेदी करणार आहे चला तर मग जाणुन घेऊया नेमका काय आहे मामला. गौशालांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि छत्तीसगडमध्ये आर्थिक घडामोडी वाढवण्यासाठी छत्तीसगड सरकार शेण खरेदी करत आहे. खरेदी केलेल्या शेणाचा उपयोग शेतीसाठी शेणखत बनवण्यासाठी ते वर्मी कंपोस्ट बनवण्यापर्यंत केला जाईल.

Updated on 27 September, 2021 4:04 PM IST

एवढेच नव्हे तर शेणातून वीजनिर्मितीच्या शक्यतांचाही विचार केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, विविध कारणांसाठी शेण वापरण्याचे नियोजन करून सरकार शेण खरेदी करत आहे. यासह, छत्तीसगड हे शेण खरेदी करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे, तसेच शेणखत खरेदीचे नफ्यात रूपांतर करणारे पहिले राज्य बनले आहे.

 गौशाला समितीना 5 करोड 33 लाख रुपये एवढी रक्कम दिली

मुख्यमंत्री गोधन न्याय योजना अंतर्गत शेण विकणाऱ्या पशुपालकांना तसेच गोवंश उत्पादकांना शेण खरेदी केल्याच्या बदल्यात रक्कम हसतांतरित केली गेली, महिला बचत गटांना लाभांशची किंमत आणि गौशाला समितीना तब्बल 5 करोड 33 लाख रुपयेची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर कार्यकर्माला संबोधित करताना माननीय महोदय म्हणाले की राज्यातील गौशाला अजून मजबूत बनवले जातील.

शेणापासून वीज निर्मितीची शक्यता वाटतेय म्हणुन त्यावर होणार संशोधन

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की शेणापासून वर्मी कंपोस्ट तयार केले जाईल, जेणेकरून वर्मी कंपोस्टचा वापर अधिक प्रमाणात होईल आणि वर्मी कंपोस्टच्या वापराला एक प्रोत्साहन मिळेल, या संदर्भात काम होणे आवश्यक आहे.  ते म्हणाले की, शेणापासून वीजनिर्मितीच्या शक्यतांचा अभ्यास केला जाईल. यासह, राज्यातील गौशाला चाराच्या बाबतीत स्वयंपूर्ण होतील आणि तेथे आर्थिक उत्पनाचे स्रोत वाढतील याचा प्रयत्न केला जात आहे.  मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात गौशालाकडे लोकांचा कल वाढत आहे, गौशाळांना अधिक मजबूत केले पाहिजे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना गौशालाची देखभाल, दुरुस्ती आणि बांधकामांच्या गरजेचा सतत आढावा घेण्याची आणि आवश्यकतेनुसार कामे करत राहण्यास सांगितले.

 आतापर्यंत चक्क 100 कोटिहून अधिक शेण खरेदी

या प्रसंगी, मुख्यमंत्र्यांनी गोधन न्याय योजनेअंतर्गत गोठा मालक आणि संग्राहकांच्या खात्यात खरेदी केलेल्या शेणाच्या बदल्यात 27 व्या हप्त्याप्रमाणे 1 कोटी 74 लाख रुपयांची रक्कम ऑनलाइन हस्तांतरित केली. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की छत्तीसगड सरकारने आतापर्यंत 100 कोटी 82 लाख रुपये किमतीचे शेण पशुपालक आणि संग्राहकांकडून खरेदी केले आहे.

 Source TV9 Bharatvarsh hindi

English Summary: goverment buying 100 crore cow dung
Published on: 27 September 2021, 04:04 IST