News

केंद्र सरकारच्या माध्यमातून तुरीकरिता हमीभाव केंद्रे (Tur Hamibhav Kendra) सुरु करण्यात आली आहेत. राज्यात 1 जानेवारीपासून 186 खरेदी केंद्र उभारण्यात आली आहेत. या माध्यमातून तूरीची खरेदी केली जात आहे

Updated on 15 January, 2022 12:33 PM IST

केंद्र सरकारच्या माध्यमातून तुरीकरिता हमीभाव केंद्रे (Tur Hamibhav Kendra) सुरु करण्यात आली आहेत. राज्यात 1 जानेवारीपासून 186 खरेदी केंद्र उभारण्यात आली आहेत. या माध्यमातून तूरीची खरेदी केली जात आहे. या केंद्रावर 6 हजार 300 रुपये हा दर देण्यात आला आहे. आता केंद्र शासनाच्या किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना (Farmer Producer Company) देखील शेतकऱ्यांची तूर खरेदी करता येणार आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्यक्ष याला सुरवात झाली असून दोन्ही जिल्ह्यातील 27 शेतकरी उत्पादक कंपन्या (Farmer Production Company) तूरीची खरेदी करणार असून शेतकऱ्यांच्या नोंदी त्यांच्याकडे झाल्या आहेत. तूरीची खरेदी ही हमीभाव केंद्राप्रमाणेच केली जाणार असून हमीभाव केंद्राअंतर्गत या कंपन्याचा कारभार सुरु राहणार आहे.

शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये तूर विक्रीसाठी आवश्यक असणारी प्रक्रिया पार पाडली जात आहे. सुरवातील शेतकऱ्यांना नाव नोंदणी करावी लागणार आहे. याकरिता नाव नोंदणी करिता ही कागदपत्रे महत्वाची आहेत.

१) 7/12 उतारा, 8 अ,
२) पिकपेरा, सातबारा उतार्‍यावर तूर पिकाची नोंद व तलाठ्याची सही
३) बॅंकेचे पासबुकची झेरॉक्स, बँक खात्यास जोडलेला मोबाईल नंबर
४) आधार कार्ड

परभणी (Parbhani) आणि हिंगोली (Hingoli) जिल्ह्याचा विचार करता 27 शेतकरी कंपन्याना पहिल्याच टप्प्यात परवानगी देण्यात आली आहे. तूरीची खरेदी ही हमीभाव केंद्राप्रमाणेच केली जाणार असून हमीभाव केंद्राअंतर्गत या कंपन्याचा कारभार सुरु राहणार आहे.

परभणी जिल्ह्यातील तूर खरेदी कंपनी

रामेटाकळी कृषिहब अॅग्रो प्रोड्यूसर्स कंपनी, सिरसम येथील टी. एन. पाटील अॅग्रो प्रोड्यूसर्स कंपनी, चिकलठाणा येथील श्री. जीवाजी अॅग्रो फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनी, धारासूर येथील धारासूर फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनी, फरकांडा येथील पौळ ॲग्रो प्रोड्यूसर्स कंपनी, एरंडेश्‍वर येथील जगद्‌गुरू संत तुकाराम अॅग्रो प्रोड्यूसर्स कंपनी लिंबेवाडी येथील अजंता सेल्फ रिलायंट फार्मर्स प्रोड्युर्स कंपनी, एरंडेश्‍वर पूर्णा फाटा येथील अर्बन शेतकरी फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनी, भोगाव येथील भोगाव देवी फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनी, देवठाणा येथील वाल्मीकेश्‍वर अॅग्रो प्रोड्यूसर्स कंपनी, वर्णा येथील वर्णेश्‍वर अॅग्रो प्रोड्यूसर्स कंपनी, जांब येथील दत्तप्रयाग अॅग्रो प्रोड्यूसर्स कंपनी, गोगलगाव येथील रावी फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनी, या शेतकरी उत्पादक कंपन्याच्या ठिकाणी हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी शेतकरी नोंदणी सुरू झाली आहे.

English Summary: Good news : Turi will be procured from farmers producing companies
Published on: 12 January 2022, 06:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)