Maharashtra Rain :
उघडीप दिलेल्या पावसाने राज्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. बहुतांश भागात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. तसंच काल (दि.८) रोजी देखील गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर राज्याच्या बऱ्याच भागात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने देखील राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
खानदेशात पावसाच्या सरी
गेल्या एक महिन्याच्या विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे कापूस आणि सोयाबीन या पिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
वर्ध्यात पावसामुळे नाले वाहू लागले
वर्धा तालुक्यातील आंबोडा इथला एक युवक भदाडी नाल्याच्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. पावसानं चांगलाच जोर पकडल्यानं नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत.
नाशिक जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी पाऊस
महिन्या भरापासून दिलेल्या पावसाच्या खंडाने नाशिक जिल्ह्यात देखील हजेरी लावली आहे. तसंच काल देखील शहरात पाऊस होता. तर आज दुसऱ्या दिवशी देखील पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
कोकणात मुसळधार पाऊस
कोकणात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने देखील कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला. तसंच पुढील दोन देखील कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
Published on: 08 September 2023, 10:40 IST