News

अकोला (Akola) जिल्ह्यातुन तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी जिल्ह्यासमवेतच राज्यात सर्वत्र तुरीचा हंगाम सुरू झाला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व बाजारपेठेत तुरीची आवक बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Murtijapur Agricultural Produce Market Committee) तुरीला चांगला समाधानकारक बाजार भाव मिळत असल्याने तूर उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचे दिसत आहे.

Updated on 06 February, 2022 1:00 PM IST

अकोला (Akola) जिल्ह्यातुन तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी जिल्ह्यासमवेतच राज्यात सर्वत्र तुरीचा हंगाम सुरू झाला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व बाजारपेठेत तुरीची आवक बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Murtijapur Agricultural Produce Market Committee) तुरीला चांगला समाधानकारक बाजार भाव मिळत असल्याने तूर उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचे दिसत आहे.

सध्या मुर्तीजापुर कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन तुरीला 6060 ते 6 हजार 585 प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव मिळत आहे. शासनाने या हंगामासाठी तुरीला सहा हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल असा हमी भाव (Guaranteed price) दिला आहे. मात्र शासनाने लावून दिलेल्या हमीभावापेक्षा खुल्या बाजारात तुरीला चांगला विक्रमी दर मिळत आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी विशेष समाधानी असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

खरीप हंगामात (Kharif Season) झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील कापूस (Cotton) या मुख्य पिकाला मोठा फटका बसला होता, त्यामुळे बहुतांशी शेतकरी तुरीच्या पिकावरच अवलंबुन होते. तुरीच्या पिकालाही मध्यंतरी झालेल्या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. सध्या बाजारपेठेत येत असलेली नवीन तुर गारपिटीने ग्रासलेली आहे. त्यामुळे तुरीचा दर्जा पुरता खालावला गेला आहे मात्र असे असले तरी तुरीला समाधान कारक बाजार भाव (Market price) मिळत आहे. एवढेच नाही, सध्या बाजारपेठेत दाखल होणारी तूरमध्ये आद्रतेचे प्रमाण हे खूप अधिक आहे असे असूनही तुरीला मिळत असलेला दर तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे. तसेच व्यापाऱ्यांच्या मते, बाजारपेठेत दाखल झालेली तुर चांगल्या दर्जाची आहे आणि म्हणूनच तुरीला समाधानकारक बाजार भाव मिळत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

मागच्या आठवड्यात तुरीला सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतच बाजार भाव मिळत होता, त्या वेळी मिळत असलेला दर हा हमीभावापेक्षा (Minimum Supporting Price) कमी होता. मात्र सध्या मुर्तीजापुर बाजार समितीत तुरीला समाधानकारक बाजारभाव मिळत आहे. सध्या तुरीच्या दरात पाचशे रुपयांची घसघशीत वाढ झाल्याचे समजत आहे. 3 फेब्रुवारी रोजी, मुर्तीजापुर बाजार समितीत तुरीला 6500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला, जो की या हंगामातील उच्चांकी दर आहे. सध्या मूर्तिजापूर बाजार समितीत समाधान कारक बाजार भाव मिळत असतानादेखील तूर उत्पादक शेतकऱ्यांनी साठवणुकीवर भर दिल्याचे चित्र बघायला मिळत आहे. परिणामी बाजारपेठेत अपेक्षित आवक नसल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी मागील काही दिवसांपासून तुरीच्या आवक मध्ये थोडी वाढ नमूद करण्यात आली, तुरीची 900 किंटल होणारी आवक आता पंधराशे पोते पर्यंत पोहोचली आहे. यामध्ये नवीन तुरी समवेतच जुन्या तुरीची देखील आवक बघायला मिळत आहे. तसेच आगामी काही दिवसात आवकमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. आगामी काही दिवसात तुरीचे दर वाढतील कि घटतील हे सर्वस्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून असल्याचे व्यापार्‍यांनी नमूद केले.

English Summary: good news pigeon pea rates higher than msp
Published on: 06 February 2022, 01:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)