कांद्याच्या दरात नेहमी चढ-उतार होत असतो. कांद्याची आवक किती होती यावरून कांद्याच्या दारात नेहमी चढ-उतार जाणवतो. आता मागणीमुळे कांद्याच्या दरात पुन्हा सुधारणा झाली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळत आहे. कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ३००० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
गेल्या आठवड्यात कांद्याच्या दरात किंचित घसरण झाली होती. पण या सप्ताहात मागणीतील स्थिरतेमुळे पुन्हा दरात काहीशी सुधारणा झाली. कांद्याची आवक स्थानिकसह बाहेरील जिल्ह्रयातून झाली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक रोज ५०० ते ६०० गाड्यांपर्यंत होत आहे. गेल्या काही दिवसांपासून आवकेत लक्षणीय वाढ झाली आहे. या सप्ताहातही आवकेचे प्रमाण तुलनेने चांगले राहिले.
सरासरी १७०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर कांद्याला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीठ यामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे कांदा खराब झाला आहे. यामुळे परिणामी उत्पन्न कमी झाले आहे.
Published on: 08 February 2022, 10:36 IST