News

भारत देश हा एक कृषी प्रधान देश आहे. येथील बहुतांशी लोकांनचा व्यवसाय हा शेती हाच आहे. काबाडकष्ट करून शेतकरी राजा आपल्या शेतामध्ये पीक पिकवत असतोगेल्या काही दिवसांपासून खतांच्या दारात नियमितपणे वाढ होत असल्याने आपल्याला दिसत आहे. खतांच्या वाढत्या दरामुळे शेतकरी राजा त्रस्त झाला आहे.

Updated on 14 June, 2021 4:44 PM IST

पहिल्यापेक्षा 500 रुपयांनी DAP वरील अनुदान वाढवले:

शेतीमध्ये जर शेतकऱ्यांना चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर शेतात खत घालणे खूपच गरजेचे आहे. कारण खताशिवाय शिवारात अजिबात पीक चांगली येत नाहीत.गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने डाय अमोनिया फॉस्पेट म्हणजेच DAP या खतावरील अनुदान वाढवण्यासाठी अनुदान जाहीर केले आहे.50 किलो च्या DAP च्या पोत्यावरील अनुदान हे 700 रुपयांवरून 1200 रुपये केले आहे. पहिल्यापेक्षा 500 रुपयांनी DAP वरील अनुदान वाढवले आहे. त्यामुळं आता अनुदानित DAP खत ही फक्त 1200 रुपयांना मिळणार आहेत.

हेही वाचा:महा-डीबीटी पोर्टलवर नोंदणी केलेल्या वंचीत लाभार्थ्याना अनुदानीत सोयाबीन बियाणे द्या -स्वाभिमानी व शेतकरी संघटना

जाणून घ्या,अनुदानित DAP खत कसे मिळवायचे:

  1. DAP खत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या जवळ आधार कार्ड आणि शेतकरी कार्ड ची ,झेरॉक्स असणे गरजेचे आहे. हे 2 कागदपत्रे दिल्यावर DAP खत आपल्याला 1200 रुपयांना मिळणार आहेत.
  2. या सोबतच प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या अंगठ्याचे ठसे देणे अनिवार्य आहे. त्यानंतर DAP वरील अनुदान आपल्या खात्यात जमा होईल.
  3. DAP च्या एका पोत्यामागे केंद्र सरकार 1211 रुपये कंपन्यांना अनुदान देणार आहे. त्याचबरोबर DAP खतांच्या अनुदानासाठी केंद्र सरकार 14775 रुपये खर्च करणार आहे असे म्हटले जाते.

कोरोनाचे वाढते संकट आणि त्यात आधी वाढलेले खतांचे भाव आता या पासून बळीराजा थोडा सुखावला जाईल यात काही शंकाच नाही . खताचे वाढते भाव याला कारण म्हणजे विदेशातील खताचे भाव वाढले हे आहे असे काही दिवसापूर्वी सूत्रांकडून कळविण्यात आले होते.

English Summary: Good news! Now you can get DAP fertilizer for only Rs. 1200, these are the required documents
Published on: 14 June 2021, 04:31 IST