राज्यातील महा विकास आघाडी सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला व बळीराजाला प्राथमिकता दिली आहे. या अर्थसंकल्पमध्ये राज्य सरकारने शेतकरी कल्याणाच्या अनेक योजना कार्यान्वित केल्या जातील असे स्पष्ट केले आहे. आता या योजनेची राज्य सरकार द्वारे प्रत्यक्षात अंमलबजावणी देखील होता ना बघायला मिळत आहे. मध्यंतरी केळी पिकाला फळपीक म्हणून राज्य शासनाने मान्यता दिली यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना अनेक योजनांचा आता लाभ घेता येणार आहे.
एवढेच नाही तर आता केळी पिकाची लागवड मनरेगा मार्फत देखील केली जाऊ शकते. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की राज्यात सर्वात जास्त केळी लागवड खानदेशात बघायला मिळते. खानदेश मधील जळगाव जिल्हा केळीच्या उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचा सर्वात जास्त फायदा जळगाव जिल्ह्याला होणार असल्याचे सांगितले जात आहे.
कृषी विभागाने या विषयी अधिक माहिती देताना सांगितले की, इतर फळपिकांप्रमाणे केळी पिकाची लागवड देखील आता मनरेगा मार्फत करता येणे शक्य होणार आहे, यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होणार असून नुकसान भरपाई देखील मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळीला फळपीक चा दर्जा देण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे आणि आता शेवटी त्यांच्या मेहनतीला यश आले असून याचा सर्वात जास्त फायदा त्यांनाच होणार आहे.
हे पण वाचा:-शेतकरी बांधवांनो काळजी घ्या! पुढचे तीन दिवस आहेत पावसाचे; 'या' जिल्ह्यात होणार अवकाळीचे आगमन
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मनरेगा अर्थात रोजगार हमी योजनेअंतर्गत आंबा लिंबू मोसंबी फळबाग पिकांची लागवड केली जात असे. आता या पिकांमध्ये केळी या फळबाग पिकाचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे केळी पिकासाठी आवश्यक उत्पादनखर्चात बचत होणार असल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नाही मनरेगा अंतर्गत फळबाग पिकांसाठी अनुदान देखील दिले जाते त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना देखील मनरेगा अंतर्गत अनुदान मिळणार आहे.
मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी म्हणजेच खड्डे खोदणे यापासून ते लागवड करण्यापर्यंत तसेच लागवड केल्यानंतर फळबाग जोपसण्यासाठी देखील योजनेत विहित केलेल्या मजुरी प्रमाणे मजुरी दिली जाते. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शासनाकडून फळबाग पिकांची रोपे देखील पुरवली जातात. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी बचत होणार आहे.
हे पण वाचा:-Pm Kisan: ई-केवायसी झाली नाही तरी मिळतील का 2000 रुपये? वाचा काय आहेत शेतकऱ्यांच्या अडचणी
आता केळीला फळ पिकाचा दर्जा देण्यात आला आहे त्यामुळे इतर फळबाग पिकांप्रमाणे केळीला देखील आता वेगवेगळ्या योजनेचा लाभ देण्याबाबत कृषी विभागाला सूचना केल्या गेल्या आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, आठ अ इत्यादी महत्त्वाचे दस्तऐवज कृषी विभागाकडे जमा करायचे आहेत.
आता केळी उत्पादक शेतकऱ्यांना लागवडीपासून ते केळीचे पीक जोपासन्यापर्यंत सुमारे दीड लाख हेक्टरी अनुदान मिळणार आहे. याव्यतिरिक्त निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकाचे नुकसान झाल्यास नुकसानभरपाई देखील मिळणार आहे. एकंदरीत केळी पिकाला फळबाग पिकाचा दर्जा मिळाल्यापासून केळी उत्पादक शेतकऱ्यांना अनेक लाभ मिळणार आहेत.
हे पण वाचा:-आनंदाची बातमी! सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार; मार्चअखेरपर्यंत 200 कोटींची कर्जमाफी
Published on: 22 March 2022, 10:25 IST