News

सरकारने गेल्या महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. सरकारने हा निर्णय अचानक घेतला होता. त्यानंतर सरकारने साखर निर्यातीची मर्यादा निश्चित केली. तेव्हापासून सरकार तांदूळ निर्यातीवरही बंदी घालू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.शेतकऱ्यांसाठी हि आनंदाची बातमी आहे .

Updated on 14 June, 2022 9:09 AM IST

सरकारने गेल्या महिन्यात गव्हाच्या (wheat) निर्यातीवर बंदी घातली होती. सरकारने हा निर्णय अचानक घेतला होता. त्यानंतर सरकारने साखर निर्यातीची मर्यादा निश्चित केली. तेव्हापासून सरकार तांदूळ(rice) निर्यातीवरही बंदी घालू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.शेतकऱ्यांसाठी हि आनंदाची बातमी आहे .

केंद्र सरकारचा मोठा निर्णय :

तांदूळ निर्यातबंदीबाबत सुरू असलेल्या अटकळांना सरकारने  सोमवारी  पूर्णविराम  दिला. देशात तांदळाचा  मुबलक  साठा  आहे, त्यामुळे सध्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी  घालण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले. गव्हाच्या निर्यातीवर अचानक बंदी घातल्याने सरकार तांदळाची निर्यात कधीही थांबवू शकते, अशी अटकळ बांधली जात

होती.हेही वाचा:मोदी सरकार 'जन समर्थ' हे कॉमन पोर्टल सुरू करणार,अनेक सरकारी योजना एकाच ठिकाणी उपलब्ध

सोमवारी एका वृत्तानुसार, अन्न सचिव सुधांशू पांडे म्हणाले की, देशात तांदळाचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे त्याच्या निर्यातीवर सरकार निर्बंध घालणार नाही. देशातील  वाढत्या  महागाईला आळा घालण्यासाठी सरकार अनेक पावले उचलत आहे. देशात गहू आणि पिठाच्या किमती वाढल्यानंतर सरकारने गव्हाच्या निर्यातीवर  बंदी घातली  होती. त्याचबरोबर  साखरेच्या दरातील वाढ रोखण्यासाठी सरकारने साखर निर्यातीची मर्यादा निश्चित केली आहे.गेल्या वर्षी देशात तांदळाचे उत्पादन खूप चांगले झाले होते.

यंदाही मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदाही देशात तांदळाचे चांगले उत्पादन होईल, असा अंदाज वर्तवला जात  आहे. प्रमुख तांदूळ उत्पादक राज्यांचा असा विश्वास आहे की यावर्षी देखील पिकासाठी परिस्थिती अनुकूल दिसत आहे.

हेही वाचा:कापूस, हळद ,मक्याच्या भावात मोठी घसरन ,जाणून घ्या सविस्तर माहिती


आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये अधिक निर्यात:

देशाची तांदूळ निर्यात वाढवण्यासाठीही सरकार पावले उचलत आहे. अशा देशांची ओळख पटवली जात आहे, ज्यामध्ये तांदळाचा वापर जास्त आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताने ९.६ अब्ज डॉलरचा तांदूळ निर्यात केला. २०१९-२० या आर्थिक वर्षातील ६.४ अब्ज डॉलरच्या निर्यातीपेक्षा हे प्रमाण जास्त आहे.

English Summary: Good news no more ban on rice exports, explains central government
Published on: 14 June 2022, 09:09 IST