News

किसान क्रेडिट कार्ड योजना ही शेतकऱ्यांसाठी सरकारने सुरु केली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य मिळावे, यासह शेतीसंबंधित काही साधने असतील ते या कार्डच्या मदतीने घेता येतील. सावकराकडून अधिकच्या व्याजदरात कर्ज न घेता शेतकऱ्यांनी या कार्डच्या मदतीने कर्ज घ्यावे जेणेकरून कमी व्याजदरात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल.

Updated on 25 July, 2020 9:19 PM IST


किसान क्रेडिट कार्ड योजना ही शेतकऱ्यांसाठी सरकारने सुरु केली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य मिळावे, यासह शेतीसंबंधित काही साधने असतील ते या कार्डच्या मदतीने घेता येतील. सावकराकडून अधिकच्या व्याजदरात कर्ज न घेता शेतकऱ्यांनी या कार्डच्या मदतीने कर्ज घ्यावे जेणेकरून कमी व्याजदरात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल. देशातील सर्व शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट असावे यासाठी सरकारने पीएम किसान योजनेशी किसान क्रेडिट कार्ड योजनेला जोडले आहे. हे कार्ड घेण्याआधी शेतकऱ्यांनी काही गोष्टींची माहिती घ्यावी, जी तुमच्या कामाची आहे.

किसान क्रेडिट कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त ४ टक्के व्याजदराने कर्ज मिळते. आपल्याला  साधारण ३ लाख रुपयांचे कर्ज पाच वर्षासाठी मिळते. पण किसान क्रेडिट कार्डच्या योजनेचा लाभ न घेता कर्ज घेतल्यास तुम्हाला ९ टक्के व्याजदर द्यावा लागेल. पण यावर बँक आपल्याला २ टक्के अनुदान देत असते, म्हणजे आपल्याला फक्त ७ टक्के व्याजदराने कर्ज मिळते. जर आपण वेळेवर कर्ज फेडले तर आपल्याला अतिरिक्त ३ टक्क्यांची सूट मिळते. म्हणजे आपल्याला फक्त ४ टक्के व्याज द्यावा लागतो.

पाच वर्षाची असते वैधता -

या योजनेची असते पाच वर्ष वैधतता असते. इतकेच नाही तर तुम्हाला १.६ लाख रुपयांचे कर्ज कोणतेच तारण न देता मिळत असते. यासर्व सुविधा किसान क्रेडिट कार्डधारकांना मिळत असतात. जर आपण प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेसाठी अर्ज केला असेल तर आपल्याला किसान क्रेडिट कार्डसाठी कागदपत्रे देण्याची गरज नसते, याशिवाय आपल्याला कार्ड लवकर मिळते. को- ऑपरेटिव्ह बँक, रिजनल रुरल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय,  या बँकेत आपण कार्डसाठी अर्ज करु शकतात.

English Summary: Good News ! kisan credit card valid for five years
Published on: 25 July 2020, 09:18 IST