तमाम शेतकरी बंधूंसाठी खूशबर , वेस्ट डिकंपोजरचे जनक आपले भारतीय शास्त्रज्ञ श्री.डॉ. किशन चंद्राजी, हे आपल्या साठी १ दिवसीय शिबीर घेण्यासाठी उपलब्ध झाले आहेत, हे आपले भाग्य.
डॉ. चंद्राजी यांनी भारतीय अनुसंधान केंद्र, गाझियाबाद येथे काम करत असताना देशी गाईच्या पंचगव्यापासुन वेस्ट डि कंपोजरचा शोध लावला, सुरूवातीला यामध्ये नत्र,स्फूरद,पालाश व विघटन करणारे ( कुजवणारे) जीवाणूंची निर्मिती केली ,शेतकरी ते वापरून त्या व्दारे चांगले उत्पादन घेवू लागले, यातूनच अजून संशोधन वाढवत जावून नंतर १० ते १२ प्रकारचे जीवाणू तयार करून ते ही शेतकऱ्यांना अल्प दरात उपलब्ध करून दिले.
काळानुसार त्यात पुन्हा संशोधन करून सध्या ६०+ प्रकारचे जीवाणूंचे कल्चर बनवले , आणि या सर्व कल्चरचे वैशिष्ट असे की एकदा एक बाटली खरेदी केली की पुन्हा नवीन विकत घ्यायची गरज नाही, वरील सर्व कल्चर बनवणे अगदी सोपे २०० लिटर पाणी + कल्चर १ बाटली + २ किलो गुळ , ३ दिवसात वापरण्यास तयार .. हे वापरताना प्रतीपंप २ ते ४ लिटर तयार कल्चर वापरावे ..जमीनीतून देण्यासाठी जे तयार कल्चर पाणी न टाकता ठिबक,पाटपाणी, आळवणी स्वरूपात द्यावे, यामुळे जमीनीत जीवाणूंची संख्या वाढते, जमीन भूसभूशीत होते पिकांना सर्व प्रकारची अन्नद्रव्ये या जीवाणूमुळे प्राप्त होतात. या डिकंपोजरपासुन विविध निविष्ठा
जसे की , दगडरसायन, सुक्ष्मअन्नद्रव्ये, झाडपाला औषधी, वगैरे वगैरे जे काही बनवायचे ते ते यात टाकून त्याचे त्यात विघटन होवून ते पिकांना उपलब्ध करून देता येते.
असे विविध प्रकारच्या निविष्ठा कशा बनवाव्यात, कसा वापर करावा, किती करावा , एकरी प्रमाण किती असावे यासह विविध प्रश्नावर या वेस्ट डि कंपोजरचे जनक आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत हे आपले भाग्यच आहे, तरी शेतकरी बंधूंनी या सुवर्णसंधीचा लाभ सोडू नये. ज्यांची शेती सेंद्री़य / नैसर्गिक / रासायनिक कोणत्याही प्रकारची असो प्रत्येक शेतकऱ्यांना फायदेशिर असे हे अमृत आपल्याला डॉ. किशन चंद्रांनी उपलब्ध करून दिले आहे. अशा शास्त्रज्ञांचा १ दिवय सहवास जरी मिळाला तरी आपण भाग्यवान आहोत.
चला तर मग येत्या रविवारी - १३ मार्च २०२२ रोजी
कन्हेरी मठ, कृषी विज्ञान केंद्र.
वेळ सकाळी - १० वाजता सर्व शेतकरी बंधूंनी हजर व्हावे..
कार्यक्रम २ तासाचाच होईल, नंतर प्रश्नउत्तरासाठी राखीव १ तासाचा होईल.
काही अडचण आल्यास खालील नंबरवर फोन करावा -
सुनिल कुमार -
8920274984
रविंद्र कोथळे -
9028724605
टीप - सदरचा कार्यक्रम मोफत आहे.
संयोजक - कृषी विज्ञान केंद्र ,
कोल्हापूर नँचरल्स शेतकरी गट,
Published on: 12 March 2022, 11:47 IST