News

भारतीय टपाल विभाग (पोस्ट), इंडियन आर्मीनंतर आता इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेडमध्ये (आयओसीएल) नोकरीची संधी तरुणाईला मिळणार आहे. अनेक पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Updated on 15 October, 2020 2:42 PM IST


भारतीय टपाल विभाग (पोस्ट), इंडियन आर्मीनंतर आता इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेडमध्ये (आयओसीएल) नोकरीची संधी तरुणाईला मिळणार आहे. अनेक पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पदांनुसार दरमहा सरासरी २५००० ते १.०५ लाख रुपये पगार मिळणार आहे.

या सरकारी नोकरीसाठी संबंधित ट्रेडमध्ये उमेदवारांनी तीन वर्षांचा डिप्लोमा अथवा गणित, फिजिक्स, केमिस्ट्री अथवा इंडस्ट्रियल केमिस्ट्रीमध्ये बीएस्सी पदवी धारण करणे गरजेचे आहे. ही शैक्षणिक अर्हता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नोकरीची चांगली संधी मिळणार आहे. या भरती प्रक्रियेसाठीच्या विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रताही वेगवेगळी आहे. त्याची माहिती आयओसीएलच्या अधिकृत वेबसाईटवर  उपलब्ध आहे.

भरती प्रक्रियेतील पदे

ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंट  ४ (प्रॉडक्शन) - ४९ पदे

ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंट ४ (मेक फिटर कम रिगर) /ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट - ३ पदे

ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंट ४ (इन्स्ट्रुमेंटेशन) - ४ पदे

ज्युनिअर क्वालिटी कंट्रोल अॅनालिस्ट - १ पद

एकूण जागा - ५७

असा करा अर्ज

उमेदवारांनी सरकारी कंपनी असलेल्या इंडियन ऑईलच्या https://iocl.com/ या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज प्रक्रियेला १२ ऑक्टोबर २०२० पासून सुरुवात झाली असून यासाठीची अंतिम मुदत ०७ नोव्हेंबर २०२० पर्यंत आहे.

निवड प्रक्रिया

या पदांसाठीची निवड प्रक्रिया लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. परीक्षा २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

https://www.iocrefrecruit.in/iocrefrecruit/main.aspx?adv=82&_ga=2.52931048.1300797954.1602381406-763477693.1584512576 

English Summary: Good news, get a job in Indian Oil, get a salary of Rs 1 lakh
Published on: 15 October 2020, 02:37 IST