खुशखबर ! इंडियन ऑईलमध्ये नोकरी करा; मिळवा १ लाख रुपये पगार

15 October 2020 02:34 PM


भारतीय टपाल विभाग (पोस्ट), इंडियन आर्मीनंतर आता इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेडमध्ये (आयओसीएल) नोकरीची संधी तरुणाईला मिळणार आहे. अनेक पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पदांनुसार दरमहा सरासरी २५००० ते १.०५ लाख रुपये पगार मिळणार आहे.

या सरकारी नोकरीसाठी संबंधित ट्रेडमध्ये उमेदवारांनी तीन वर्षांचा डिप्लोमा अथवा गणित, फिजिक्स, केमिस्ट्री अथवा इंडस्ट्रियल केमिस्ट्रीमध्ये बीएस्सी पदवी धारण करणे गरजेचे आहे. ही शैक्षणिक अर्हता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नोकरीची चांगली संधी मिळणार आहे. या भरती प्रक्रियेसाठीच्या विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रताही वेगवेगळी आहे. त्याची माहिती आयओसीएलच्या अधिकृत वेबसाईटवर  उपलब्ध आहे.

भरती प्रक्रियेतील पदे

ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंट  ४ (प्रॉडक्शन) - ४९ पदे

ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंट ४ (मेक फिटर कम रिगर) /ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट - ३ पदे

ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंट ४ (इन्स्ट्रुमेंटेशन) - ४ पदे

ज्युनिअर क्वालिटी कंट्रोल अॅनालिस्ट - १ पद

एकूण जागा - ५७

असा करा अर्ज

उमेदवारांनी सरकारी कंपनी असलेल्या इंडियन ऑईलच्या https://iocl.com/ या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज प्रक्रियेला १२ ऑक्टोबर २०२० पासून सुरुवात झाली असून यासाठीची अंतिम मुदत ०७ नोव्हेंबर २०२० पर्यंत आहे.

निवड प्रक्रिया

या पदांसाठीची निवड प्रक्रिया लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. परीक्षा २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

https://www.iocrefrecruit.in/iocrefrecruit/main.aspx?adv=82&_ga=2.52931048.1300797954.1602381406-763477693.1584512576 

इंडियन ऑइल इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड Indian Oil Corporation Limited Indian Oil Corporation Limited जॉब्स Indian Oil Corporation Limited jobs इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी
English Summary: Good news, get a job in Indian Oil, get a salary of Rs 1 lakh

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.