News

येत्या या पुढील काळामध्ये शेतकरी महिलांसाठी कृषी विभागाच्या ५० टक्के जागा हा राखीव असणार आहेत. जे की लक्ष्मी योजना अंतर्गत घरातील महिलेचे नाव ७/१२ उताऱ्यावर मोफत लावले जाणार आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांचा शेतीमाल आणि महिला बचत गटाच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी शासकीय जागा देखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच वन्यप्राण्यांपासून पिकांचे सरंक्षण व्हावे यासाठी मॉडेल तयार करण्यात येणार आहे अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिलेली आहे.

Updated on 22 April, 2022 12:03 PM IST

कृषी इमारतीचे उदघाटन करताना दादा भुसे यांनी सांगितले :-

कृषिमंत्री दादा भुसे यांनी ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत  तेथील कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्‌घाटन व महिला शेतकरी मेळाव्यात दिलेली आहे. त्यावेळी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, आमदार डॉ. राहुल पाटील, कृषी  सचिव  एकनाथ  डवले,  शिक्षण  संचालक  डॉ.  डी.  एन.  गोखले,  संशोधन  संचालक डॉ. दत्तप्रसाद  वासकर, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. भगवान आसेवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी बळिराम कच्छवे, महिला शेतकरी लक्ष्मी भिसे, रेणुका जाधव, यशोदा सोळंके, विजया देशमुख, द्रौपदी काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

३० टक्के वरून ५० टक्के महिलांसाठी जागा :-

दादा भुसे सांगतात की एका कृतीमधून महिलांचा सन्मान झाला पाहिजे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश आहे. जे की त्याच उद्देशाने या कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे उदघाटन हे महिला शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. कृषी क्षेत्रात मुलींचे प्रमाण हे ५५ टक्के वाढले आहे. जे की या कृषी महाविद्याल्यामुळे ग्रामीण भागात कृषी शिक्षणाची सोय  देखील  उपलब्ध झालेली आहे. हॉस्टेल तसेच कर्मचारी निवासस्थानासाठी निधी सुद्धा देण्यात येणार आहे. यापूर्वी कृषी विभागामध्ये महिला शेतकऱ्यांसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या मात्र येत्या पुढील काळात ५० टक्के जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत.

महिला शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा :-

अनिता पवार यांनी सांगितले की रोही, हरीण तसेच रानडुक्कर आणि अजून वन्यप्राणी यांच्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते जे की पिकांचे सरंक्षण करण्यासाठी रात्रभर पिकाची राखण करावी लागते. तरी सुद्धा नुकडं हे ठरलेले आहे. जे की पिकांचे या वन्यप्राण्यांपासून सरंक्षण करण्यासाठी शेतामध्ये कुंपण करण्यासाठी आर्थिक मदत करावी.

English Summary: Good news for women farmers! In future, 50 per cent seats will be reserved for women in the agriculture department
Published on: 22 April 2022, 12:02 IST