News

पुणे : भारत हा कृषी प्रधान देश आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कृषी क्षेत्राची आपल्या देशाच्या जीडीपीमध्ये मोठी भुमिका आहे. सध्या देशात कोरोनाचे संकटात कृषी क्षेत्रावर आर्थिक चलन अवंलबून आहे.

Updated on 24 August, 2020 11:55 AM IST


पुणे  : भारत हा कृषी प्रधान देश आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कृषी क्षेत्राची आपल्या देशाच्या जीडीपीमध्ये मोठी भुमिका आहे. सध्या देशात कोरोनाचे संकटात कृषी क्षेत्रावर आर्थिक चलन अवंलबून आहे. देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यात कृषी क्षेत्र महत्वाची भूमिका साकारणार असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर म्हणाले होते. याचीच एक प्रचितीची बातमी हाती आली आहे.

भारताची कृषी मालाची निर्यात मार्च ते जून २०२१ मध्ये २३ % वाढून २५ हजार ५५२ कोट रुपयांवर पोहोचली असल्याची माहिती सरकारने दिली आहे. हीच निर्यात मार्च- जून २०२० मध्ये २० हजार ७३४ कोटी रुपये होती. भारताने कोरोनाच्या काळात आपल्या निर्यातीत कोणताच खंड पडू दिला नाही. अनेक देशांना कृषी मालाची निर्यात करून या संकटाच्या काळात अनेक देशांना धीर दिला आहे. २०१९ च्या आकडेवारीनुसार भारत हा कृषीमाल निर्यातीत ३८ व्य स्थानी होता.

मात्र आता ताज्या आकडेवारीनुसार भारत हा ३४ व्या स्थानावर आहे. भारत या हा भाज्यांच्या उत्पादनात जगात ३ ऱ्या स्थानावर आहे मात्र भाज्यांच्या निर्यातीत १४ व्य स्थानावर आहे. निर्यातीत सुधारणा करण्यासाठी सरकारने अनेक पावलं उचलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारताची हाक दिली आहे. आता कृषी क्षेत्रात त्याच्या अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत. सरकारतर्फे कृषी क्षेत्रासाठी विशेष प्लॅन बनवण्यात येत आहे. 

English Summary: Good news for the country! Exports of agricultural commodities increase by 23%
Published on: 24 August 2020, 11:55 IST