News

सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

Updated on 11 September, 2023 3:03 PM IST

St Bus News Update :

एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के होणार आहे.

सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य शासनावार ९ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. त्याचप्रमाणे असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना २१२ टक्के महागाई भत्ता देण्यात येईल.

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे एसटी महामंडळातील ९० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी अधिकृत ट्वीट देखील केले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी या महागाई प्रस्तावास मान्यता दिल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाच्या अमृत महोत्सवाच्या सांगता समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे महागाई भत्ता देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेत कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचारी यांनी ऐन गणपतीच्या तोंडावर संपाची हाक दिली होती. पगारवाढ, पदोन्नती अशा विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांकडून ११ सप्टेंबरला हा संप करण्यात येणार होता. एसटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण करणार होते. पण सरकारने भत्ता वाढीचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांना काहीसा दिला आहे.

English Summary: Good news for ST employees Big increase in inflation allowance
Published on: 11 September 2023, 03:03 IST