News

चाकरमान्यांनी ग्रुपने बुकींग केले तर बस थेट पर्यंत गावापर्यंत सोडण्यासाठी येईल, असंही महामंडळाने म्हटले आहे.

Updated on 01 September, 2023 3:13 PM IST

मुंबई

कोकणातील चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील अनेक चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात जातात. त्यासाठी मुंबईतून २ हजार २०० जादा बसेस गणेशोत्सवासाठी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

जर चाकरमान्यांनी ग्रुपने बुकींग केले तर बस थेट पर्यंत गावापर्यंत सोडण्यासाठी येईल, असंही महामंडळाने म्हटले आहे. कोकणातील गणेशोत्सवासाठी हजारो चाकरमानी दरवर्षी जात असतात. त्यामुळे एसटी प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. 

यंदा १९ सप्टेंबरला गणपती बाप्पाचं आगमन होत असून आता पासून गणेशोत्सवाची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने देखील आतापासून तयारी सुरु केली आहे. तर गतवर्षी महामंडळाने गणेशोत्सवासाठी २३१० जादा बसेस कोकणातील गणेशोत्सवासाठी सोडल्या होत्या.

English Summary: Good news for servants 2200 extra buses for Ganeshotsav Corporation's decision
Published on: 02 August 2023, 01:12 IST