News

राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी व उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्काराने प्राध्यापक व विद्यार्थी सन्मानित!

Updated on 30 April, 2022 12:37 PM IST

राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी व उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्काराने प्राध्यापक व विद्यार्थी सन्मानित!

 राष्ट्रीय सेवा योजना, भारत सरकार प्रायोजित सार्वजनिक सेवा कार्यक्रम आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकांसोबत मिळून-मिसळून व त्यांना सोबत घेऊन कार्य करण्यासह शिक्षित-अशिक्षित भेदभाव दूर करीत सर्जनशील आणि रचनात्मक सामाजिक कार्यात स्वतःला गुंतविणे तथा सामाजिक व नागरिक जबाबदारीची भावना विकसित करीत सामाजिक समस्यांची जाण व सोडवणूक करण्याचे प्रमुख उद्देशाने प्रत्येक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचा कक्ष कार्यान्वित आहे. 

 राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयांना तेथील प्राध्यापकांना तसेच स्वयंसेवकांना गौरवान्वित करीत त्यांचा यथोचित सन्मान करण्याची प्रथा असून

केंद्र शासनाच्या पद्धतीवर आधारित राज्यस्तरावर राज्याचा रौप्य महोत्सवी वर्षापासून राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत पुरस्कार देण्याची प्रथा सन 1993- 94 वर्षापासून सुरू करण्यात आली. त्यानुसार राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय सेवा अंतर्गत निस्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्याना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या निस्वार्थ सेवेचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय पुरस्कार देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला. सर्वोत्कृष्ट विद्यापीठ पुरस्कार, सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक पुरस्कार, कार्यक्रम समन्वयक प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार, सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार, सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार असे राज्यस्तरीय पुरस्कारांची गट निश्चित करण्यात आली असून काही अपरिहार्य कारणामुळे हा पुरस्कार सोहळा 2016-17 पासून संपन्न होऊ शकला नाही

राज्य शासनाच्या उच्च शिक्षण मंत्रालयाने या राज्यस्तरीय पुरस्कार (2016-17 ते 2021-22) सोहळ्याचे आयोजन दि.25/4/2022 रोजी करण्यात आले, राष्ट्रीय सेवा योजना राज्य स्तरीय पुरस्कार २०१६-१७ ते २०२०-२१ चे पुरस्कार वितरण सोहळा नुकताच श्रीमती नाथिबाई दामोदर ठाकरेसी विद्यापीठ, मुंबई येथे पडला, या कार्यक्रमात डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथील राज्यस्तरीय उत्कृष्ट रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी (2016-17) म्हणून सौ वृषाली ओक, श्री शिवाजी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, अमरावती

 तसेच राज्यस्तरीय उत्कृष्ट रा.से.यो.स्वयंसेवक

(पुरस्कार : स्मृतिचिन्ह व रु.2000/- प्रत्येकी )

1. गौरव राजपाल सुरत्ने (2016-17) जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, अमरावती

2. अक्षय विठ्ठलराव गायकवाड (2017-18) वनविद्या महाविद्यालय, अकोला

3. कुणाल सुनील वानखडे (2019-20) कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, अकोला यांना राज्याचे सन्माननीय उच्च शिक्षण मंत्री मा.ना.उदयजी सामंत साहेब यांचे शुभहस्ते

तथा एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर चे कुलगुरु डॉ. आशिष पातूरकर यांचे प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांचे मार्गदर्शनात अधिष्ठाता कृषी डॉ. ययाती तायडे यांचेसह सर्वच माजी अधिष्ठाता विद्यापीठांतर्गत सर्वच महाविद्यालयातील सहयोगी अधिष्ठाता, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांना त्यांच्या नियोजनबद्ध अथक परिश्रमातून विद्यापीठाला राज्यस्तरावरील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आल्या बद्दल विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. किशोर कुबडे यांनी सर्वांचेच अभिनंदन करीत भविष्यातील राष्ट्रीय पुरस्कारासाठी कटिबद्धता व्यक्त केली. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राज्यस्तरीय पुरस्काराने विद्यापीठांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची व समाधानाची भावना निर्माण झाली आहे.

 

प्रतिनिधी- गोपाल उगले

English Summary: Good news for pdkv University, great performance in State Level Awards Ceremony!
Published on: 30 April 2022, 12:33 IST