News

कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी सरकारने देशात लॉकडाऊन लागू केला आहे. यामुळे अनेक कामे थांबल्याने अनेकांच्या हातातील चलनाला ब्रेक लागला आहे. यावर तोडगा म्हणून केंद्र सरकारने काही दिलासादायक निर्णय घेतले आहेत.

Updated on 02 April, 2020 5:18 PM IST


कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी सरकारने देशात लॉकडाऊन लागू केला आहे. यामुळे अनेक कामे थांबल्याने अनेकांच्या हातातील चलनाला ब्रेक लागला आहे. यावर तोडगा म्हणून केंद्र सरकारने काही दिलासादायक निर्णय घेतले आहेत. नोकरदार वर्गासह शेतकऱ्यांसाठीही सरकारने अनेक महत्त्वपुर्ण निर्णय घेतले आहेत. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या सर्व पीक कर्जावरील ईएमआय हफ्ते थांबविण्याचे निर्देश सरकारने बँकांना दिले आहेत. किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकरी पीक कर्ज घेत असतात. या कार्ड द्वारे कर्ज घेणाऱ्यासाठी सरकारने एक दिलासादायक बातमी दिली आहे.

या कार्डच्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे, ते या कर्जाचा हफ्ता ३१ मे पर्यंत जमा करु शकतील. यासह कर्ज फेडताना बँक शेतकऱ्यांकडून कोणत्याच प्रकारचे व्याज घेणार नसल्याचेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अवकाळी पाऊस आणि आता कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे बळीराजावरील संकट अधिक झाले आहे. लॉकडाऊनचा शेतकऱ्यांच्या आर्थिक बजेटवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी मार्केट बंद असल्याने आपल्या शेतमालाची वाहतूक करता येत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अशा सरकारकडून घेण्यात आलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठऱेल. यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळेल यात शंका नाही. दरम्यान कृषीशी संबंधित व्यापार चालू राहतील असा आदेश राज्य सरकाराकडून देण्यात आले आहेत. देशभरातील शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जात आहेत. या कार्डच्या माध्यमातून तुम्ही दीड लाख रुपयांचा कर्ज विना तारण घेऊ शकता.

English Summary: good news for kisan credit card holder; no need to pay emi immediately
Published on: 02 April 2020, 05:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)