1. बातम्या

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; वीज बील थकबाकीमध्ये मिळणार माफी

KJ Maharashtra
KJ Maharashtra
वीज बील थकबाकीमध्ये माफी

वीज बील थकबाकीमध्ये माफी

शासनाने जाहीर केलेल्या कृषी पंप जोडणी धोरण 2020 अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना विज बिल थकबाकी मध्ये माफी दिली जाणार आहे. या निर्णयानुसार महावितरणाच्या पुणे परिमंडळातील सुमारे १ लाख २५ हजार १९२ कृषी वीज ग्राहकांना याचा थेट लाभ होणार आहे.

थकबाकी पैकीनिर्लेखन, व्याज थकबाकी वरील दंड माफीची एकूण १४४ कोटी ९ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. माप केलेल्या थकबाकीऐवजी उरलेल्या ५० टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास उरलेली संपूर्ण थकबाकी ही माप केली जाणार आहे.

पुणे परी मंडळाचा विचार केला तर त्या अंतर्गत येणाऱ्या मुळशी, हवेली, जुन्नर, आंबेगावमावळ व खेड तालुक्यांमध्ये जवळ-जवळ १ लाख २५ हजार १९२ कृषी ग्राहक आहेत. या सगळ्या ग्राहकांकडे व्याज व विलंब शुल्कासह एकूण थकबाकी ९२१ कोटी ८९ रुपयांचे आहे. शासनाने जाहीर केलेल्या कृषी पंप विज जोडणी धरणांमध्ये कृषी पंपासह सर्व उच्च व लघुदाब तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषी ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे.

या सगळ्या ग्राहकांच्या पाच वर्षांपूर्वीच्या वर्षापूर्वीच्या थकबाकी वरील व्याज व्याज व विलंब शुल्क शंभर टक्के माफ करण्यात आली आहे करण्यात आले आहे. व त्यावर असणारी व्याज  १८ टक्‍क्‍यांऐवजी त्या-त्या वर्षाच्या खेळत्या भांडवलावरील व्याज दरानुसार आकारण्यात येत आहे. नव्या धोरणाचा जर विचार केला तर या कृषी ग्राहकांकडे आत्ता ७७७ कोटी ८१ लाख रुपयांची मूळ थकबाकी उरली आहे. या योजनेनुसार ग्राहकांनी त्यांच्यामुळ थकबाकीच्या ५० टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ करण्यात येणार आहे.

कृषी ग्राहकांना संबंधित वीजबिलांची थकबाकी, माफी व भरावयाची रक्कम इत्यादीचा तपशील महावितरणने  https://bilcal.mahadiscom.in/agpolicy2020/ या वेबपोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters