राज्यातील कर्जाची नियमित परतफेड शेतकर्यांना ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. दरम्यान, ११मे पर्यंत पात्र शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. योजनेचे स्पष्टीकरण झाल्यानंतर संगणक प्रणालीचे काम पूर्ण होऊन पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान, या सर्व बाबी लवकरच पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होतील. बँकांनी नियमितपणे कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांची यादी पाठवली असल्याने येत्या दोन आठवड्यांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पोहोचण्याची शक्यता आहे. प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करताना महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतमजूर सन्मान वर्ष साजरे करण्याची घोषणा केली होती.
अर्थसंकल्प सादर करताना पवार म्हणाले की, शेती हा विकासाचा पाया आहे, असे सरकारचे मत आहे. शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी योजनांसाठी ३,००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच हे वर्ष ‘महिला शेतकरी आणि कृषी कामगार सन्मान वर्ष’ म्हणून राबविण्याची घोषणा करताना पवार म्हणाले की, महिला शेतकऱ्यांसाठीच्या कृषी योजनांमध्ये ३० टक्के तरतूद वाढवून ती ५० टक्के करण्यात येणार आहे. यापुढे कृषी विभागाच्या योजनांमध्ये ३ टक्के निधी आजी-माजी सैनिकांनाही उपलब्ध करून दिला जाईल, असेही ते म्हणाले.
कर्जमाफीच्या लाभाचा अभ्यास करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काही मंत्र्यांची उपसमिती यापूर्वीच स्थापन करण्यात आली आहे. नियमित कर्जदारांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देताना, कोणत्या वर्षी आणि कोणत्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ द्यायचा याचाही अभ्यास समिती करणार आहे. कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर आतापर्यंत थकबाकी नसलेल्या नियमित कर्जदारांनाच याचा लाभ घेता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमुळे पीक कर्ज वितरणात वाढ झाली असून फेब्रुवारी अखेरीस ४१,०५५ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात ९११ कोटी रुपये उपलब्ध झाले असून, त्याचा फायदा सुमारे ४३ लाख १२ हजार शेतकऱ्यांना होणार आहे, असे सांगून पवार यांनी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र सुरू करण्याची घोषणा केली.
महत्वाच्या बातम्या
Police Recruitment: मोठी बातमी! राज्यात लवकरच भरली जाणार 7 हजार पदे; पोलीस भरतीची तारीख जाहीर
SBI Loan: तर तुम्हीही एसबीआयचे ग्राहक असाल तर मिळू शकते तुम्हालाही 35 लाख रुपयांपर्यंतचे लोन, वाचा अटी
Published on: 27 May 2022, 01:35 IST