येणाऱ्या पुढील काळात सोयापेंड च्या आयातीवर जो परिणाम होणार आहे तो परिणाम सोयाबीन पिकावर होईल असा अंदाज वर्तवला गेला आहे. परंतु अशा परिस्थितीत सुद्धा सोयाबीन चे भाव वरचढ झाले असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या लांबल्यामुळे बाजारात सोयाबीन ची आवक कमी झालेली आहे त्यामुळे सोयाबीन च्या दरात जी वाढ झालेली आहे ती वाढ कायम राहावी अशी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. यावर्षी सुद्धा राज्यात सोयाबीन ची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.
खरीप हंगामात झालेली उशिरा पेरणी:
यावर्षी सोयाबीन पिकाचा(crop) मोठ्या प्रमाणात पेरा वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढेल अशी आशा शेतकऱ्यांनी(farmer) केली आहे.मात्र मागील काही दिवसात जे पाऊसाचा अचानकपणे चढउतार तसेच वेगवेगळ्या कीड पडल्यामुळे सोयबिन उत्पादक शेतकऱ्यांची थोडी चिंता वाढलेली आहे आणि अशाच परिस्थितीत सोयाबीन च्या किमती वाढल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात सोयापेंड च्या आयातीस परवानगी दिलेली आहे मात्र देशात खरीप हंगामात झालेली उशिरा पेरणी आणि बाजारात सोयाबीन चा तुडवडा असल्याने किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.दरवर्षी १ ऑक्टोबर पासून बाजारात सोयाबीन पीक दाखल होते परंतु यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन पिकाच्या पेरण्या उशिरा झाल्यामुळे यंदा बाजारात सोयाबीन पिकाची आवक सुदधा उशिरा होणार आहे असे अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केलेले आहेत.
बाजारात जर सध्या पाहायला गेले तर फक्त २ ते ३ लाख टन सोयाबीन उपलब्ध आहे तसेच काही राज्यातील इतर भागामध्ये सोयाबीन आवक सुरू आहे. पहिल्या पेरातील सोयाबीन लवकरच बाजारात दाखल होईल असा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तवला आहे.केंद्राने यावर्षी सुमारे १२ लाख क्विंटल सोयापेंड आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे, जसे की इतर राज्यात सोयाबीन ची काही प्रमाणात आवक करणे सुद्धा चालू झालेले आहे. देशात यापूर्वी सोयाबीन ची आवक कमी झाली असल्यामुळे बाजारात सोयाबीन च्या किमती वाढलेल्या आहेत.सोयाबीन च्या दरात ५०० ते ७०० रुपये ने वाढ झाल्यामुळे सोयाबीन चा दर सध्या १० हजार रुपये वर पोहचलेला आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग खुश आहे मात्र असाच दर राहावा अशी अपेक्षा आहे.
सोयापेंडचेही भाव वाढले:
सोयाबीन चे दर वाढत असल्याने सोयापेंड चे दर सुद्धा जोरात वाढलेले आहेत. मागील आठवडा मध्ये सोयापेंड चा पुरवठा कमी झाला असल्याने त्यांच्या दरात ३ ते ४ हजार रुपये ने वाढ झालेली आहे.
सोयाबीन 10 हजारांवर:
मागील वर्षात सोयाबीन च्या दरात चढ उतार तर झालेला होता. यावर्षी अनियमित पावसामुळे सोयाबीन चे उत्पादन घटले तसेच किडीचा पण प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन चे उत्पादन घेतले आणि बाजारात सोयाबीन ची आवक घटली त्यामुळे दरात सुद्धा चांगल्या प्रकारे वाढ झाली. सोयाबीन चे दर अजून वाढल्यामुळे जवळपास दहा हजार रुपये वर दर गेला.
Published on: 07 September 2021, 02:30 IST