News

सध्या देशात ५ राज्यात निवडणुकीची धामधूम सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. असे असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांबाबत एक मोठा निर्णय घेऊ शकतात. दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे सध्या उत्तर भारतातील शेतकरी नाराज आहेत.

Updated on 15 January, 2022 3:34 PM IST

सध्या देशात ५ राज्यात निवडणुकीची धामधूम सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. असे असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांबाबत एक मोठा निर्णय घेऊ शकतात. दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे सध्या उत्तर भारतातील शेतकरी नाराज आहेत. यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोदी सरकार शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट देण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील चौथा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर करणार आहेत. यामध्ये आता काय काय घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या वार्षिक रकमेत वाढ होऊ शकते. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकर्‍यांना वार्षिक 6,000 रुपये देते. आता या बजेटमध्ये ही रक्कम वाढवली जाऊ शकते. यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागले आहे.

ही रक्कम आता आठ हजार एवढी केली जाऊ शकते. मात्र सरकारकडून यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. शेतकऱ्यांना वार्षिक 2,000 रुपये अतिरिक्त रक्कम दिली जाऊ शकते. सध्या महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शेतकर्‍यांचा शेतीचा खर्च वाढला आहे. डिझेल ते खते आणि बियाणांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. तसेच शेतकऱ्यांवर अनेक नैसर्गिक संकटे येत आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक परिस्थितीचा सामना करत आहे. यामुळे याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे शेतकर्‍यांना या महागाईतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेतले. असे असताना या सगळ्या प्रकरणामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. या आंदोलनात अनेक शेतकरी यामध्ये मृत्युमुखी पडले. यामुळे केंद्र सरकारविरोधात एक वातावरण तयार झाले आहे. यामुळे आगामी ५ राज्यातील निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. यामुळे आता काही दिवसांवर आलेल्या अर्थसंकल्पाकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

English Summary: Good news for farmers! Modi govt likely to increase Kisan Samman fund
Published on: 15 January 2022, 03:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)