राज्यातील शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज यावा तसेच पिकांची काळजी घेता यावी व दुसऱ्या काही तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्यातील जवळपास ६ हजार ग्रामपंचायतीमध्ये हवामान केंद्र उभारले जाणार आहे. यामध्ये जो पहिला टप्पा आहे त्या टप्यात ५ हजार पेक्षा ज्या गावाची जास्त लोकसंख्या आहे त्या गावास प्राधान्य दिले जाणार आहे असे राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात योग्य पद्धतीने नियोजन करून वाढ होईल असा यामागे उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. हवामान केंद्रामुळे शेतकऱ्यांना हवामान तसेच वाऱ्याचा वेग व पाऊसाचा अंदाज समजला जाईल.
नुकसानभरपाई बाबतच्या अडचणीवर होणार मात :-
मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या अनियमितपणामुळे शेतकऱ्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे मात्र जो होणार पाऊस आहे त्याची योग्य नोंद होत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान होत आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत जागी हवामान केंद्र उभारले जाणार आहे. या हवामान केंद्राचा शेतकऱ्यांना फायदा होणार असून पाऊस तसेच तापमान व वाऱ्याची वेग याचा अचूक अंदाज काढता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही.
सध्या काय आहे स्थिती..?
सध्याच्या स्थितीला ज्या ठिकाणी महसूल मंडळ आहेत त्याच ठिकाणी हवामान केंद्र उभारण्यात आले आहेत. मागील अनेक वर्षांपूर्वी २ हजार ११८ हवामान केंद्र उभारण्यात आलेली होती मात्र आता पाहायला गेले तर अनेक केंद्रे असे आहेत जी बंद अवस्थेत आढळतील त्यामुळे हवामान तसेच पाऊसाची योग्यरीत्या नोंद होत नाही. ज्या ठिकाणी चालू आहेत त्या मंडळातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते पण काही मंडळातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नाही. शेतकऱ्यांच्या याबाबत असणाऱ्या तक्रारींमध्ये वाढच होत चालली असल्याने सध्या ग्रामपंचायत स्तरावर हवामान केंद्र उभारण्यात आली आहेत.
शेतकऱ्यांना असा हा उपयोग :-
नुकसानभरपाई ची जेव्हा वेळ येते त्यावेळी विमा कंपन्या स्कायमेट कडून माहिती घेतात. ही व्यवस्था मंडळाच्या ठिकाणी असल्याने समजत नाही मात्र आता ग्रामपंचायत ठिकाणी अत्याधुनिक हवामान केंद्र उभारले जाणार असल्याने हवामान तसेच वाऱ्याचा वेग व पाऊस इ. नोंद योग्यरीत्या केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ६ हजार ग्रामपंचायत ठिकाणी हे केंद्र उभारले जाणार आहे अशी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे सांगतात.
Published on: 07 January 2022, 08:35 IST