योग्य नियोजन तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकरी शेतीमधून मोठ्या प्रमाणात उत्पादन काढत आहेत परंतु दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना वाढते उत्पादन काय परवडत नाही. कमी दरामध्ये शेतमालाची विक्री करणे शेतकऱ्यास परवडत नाही परंतु नाशिक जिल्ह्यातील एरंडोल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने ज्वारी व मका पिकांना हमीभाव देण्याचा फक्त निर्णयच घेतला नाही तर तो आमलात सुद्धा आणला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील १५ दिवसापासून याची नोंदणी सुरू आता प्रत्यक्ष खरेदी केंद्र सुरू झाले आहे.
ज्वारी, मक्याला असा आहे हमीभाव:-
ज्वारी च्या क्षेत्रात जरी घट होत असेल तरी नाशिक जिल्ह्यातील एरंडोल येथे ज्वारीचे मोठे क्षेत्र पसरले आहे. एरंडोल येथे धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची उपसमिती आहे जे की या समितीत ज्वारी पिकाला २ हजार ७३८ रुपये भाव तर मका पिकाला १ हजार ८७० रुपये प्रति क्विंटल असा भाव शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. सध्या केंद्रावर ज्वारी व मका खरेदी पिकाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी काळा पडलेला माल केंद्रावर आणू नये असे सांगितले आहे. खरेदी केंद्र उभा करण्यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी सुद्धा मदत केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला हमीभाव मिळाला आहे.
ऑनलाईनच्या माध्यमातूनही करता येणार नोंदणी:-
शेतकऱ्यांना थेट त्यांचा शेतमाल खरेदी केंद्रावर आणता नाही येणार तर त्यासाठी त्यांना पहिल्यांदा नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी ऑनलाइन असून त्यांना पिकपेरा, सातबारा 8 अ, आधार कार्ड एवढे कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. मागील काही दिवसांपासून मका पिकाची नोंदनी सुरू असल्यामुळे ४०७ शेतकऱ्यांनी यामध्ये नोंद केली आहे. आता कुठे या केंद्राला सुरुवात झाली आहे जे की एरंडोल तालुका आणि धरणगाव तालुकामधील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
एरंडोलसाठी स्वतंत्र बाजार समिती:-
शेतमालाची खरेदी विक्री सध्या उपसमितीमध्ये होत आहे परंतु स्वतंत्र बाजार समिती उभा करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून मागणी होत आहे मात्र बदलत्या राजकीय सत्तेमुळे हे अर्धवट राहिले आहे. एरंडोल तालुक्यात स्वतंत्र बाजार समिती तसेच शेतकी संघाची स्थापना करण्यात येणार असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले आहे.
Published on: 01 January 2022, 05:57 IST