News

शेतीचे अपेक्षित उत्पन्न व हवामानाचा अंदाज, यावरून सोलापूर जिल्ह्यातील पीककर्जाची (Crop Loan) मर्यादा ठरविण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा (Crop Insurance) उतरवूनही अपेक्षित विमा रक्‍कम मिळत नसल्याने आता पीक कर्जाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar) यांनी घेतला आहे.

Updated on 13 January, 2022 8:33 PM IST

शेतीचे अपेक्षित उत्पन्न व हवामानाचा अंदाज, यावरून सोलापूर जिल्ह्यातील पीककर्जाची (Crop Loan) मर्यादा ठरविण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा (Crop Insurance) उतरवूनही अपेक्षित विमा रक्‍कम मिळत नसल्याने आता पीक कर्जाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar) यांनी घेतला आहे.

त्यामुळे आता 1 एप्रिल 2022 पासून जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना वाढीव कर्ज मिळणार आहे. राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटी कृषी विकास अधिकारी आणि मागील पीकनिहाय कर्ज मर्यादेचा अभ्यास करून त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने आता शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बॅंकांनी जिल्ह्यातील जवळपास दीड ते दोन हजार शेतकऱ्यांना कर्जवाटपही केले आहे. मात्र, आता कर्ज मर्यादा वाढविल्याने बहुतेक शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे.
तत्पूर्वी, जिल्ह्यातील जवळपास 26 बँकांनी मागील खरीप हंगामात उद्दिष्टापेक्षाही अधिक कर्जवाटप केले आहे.

हेही वाचा : काय सांगता! आधार कार्ड लॉक केले जाऊ शकते? आधार कार्ड लॉक केल्याने होणारे फायदे

आता रब्बी हंगामाचे कर्जवाटप सुरू असून आतापर्यंत केवळ 22 टक्‍क्‍यांपर्यंतच कर्ज वितरीत करण्यात आले आहे. साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना उसाची बिले मिळाल्यानंतर पूर्वीचे कर्ज भरून संबंधित शेतकऱ्यांना नव्याने कर्जवाटप केले जाते. त्यानंतर रब्बीचे कर्जवाटप वाढलेले दिसेल, असेही जिल्हा अग्रणी बॅँकेकडून सांगण्यात आले. दरम्यान, पीक कर्जासाठी पात्र असलेल्या कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांच्यासह जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर यांनीही बॅंकांना केल्या आहेत.

 

वाढीव कर्ज मर्यादा अशी (हेक्‍टरी)...

पिकाचा प्रकार - आताची मर्यादा - वाढीव मर्यादा

ऊस - 95,000 - 1.15 लाख

डाळिंब - 1.30 लाख - 1.44 लाख

फळबागा - 40,000 - 1,00000

द्राक्ष - 2.10 लाख - 2.45 लाख

केळी - 1.30 लाख - 1.40 लाख

खोडवा, निडवा ऊस - 65,000 - 75,000

English Summary: Good news for farmers in Solapur, increased peak loans from banks
Published on: 13 January 2022, 08:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)